You are currently viewing वैभववाडीत मटणात आढळले किडे

वैभववाडीत मटणात आढळले किडे

संबंधित विक्रेत्यावर कारवाई करा; वैभववाडी मनसेचे तहसीलदार व मुख्याधिकारी यांना निवेदन सादर.

वैभववाडी

वैभववाडी शहरातील मटण शाॅप मधून विकलेल्या मटणात अळी व किडे आढळून आले आहेत. संबंधित मटण विक्रेत्याची चौकशी करुन त्याच्यावर कारवाई करावी. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेच्यावतीने तहसिलदार व मुख्याधिकारी नगरपंचायत वैभववाडी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत मनसे वैभववाडी तालुका संपर्क अध्यक्ष चंद्रशेखर सावंत यांनी दिलेल्या निवेदनानुसार, वैभववाडी शहरातील मटण विक्रेते दत्ता कांबळे (काडगे) यांच्याकडून दिनांक ३ सप्टेंबर रोजी बक-याचे मटण विकत घेतले. घरी नेल्यानंतर मटणात किडे व किडीच्या अळी आढळून आल्या, त्यांनी ताबडतोब मटण आणून या विक्रेत्यांना दाखविले. त्यावर सदर विक्रेत्याने मटण खूप दिवसाचे असल्याचे मान्य केले. यावेळी बाजारात आलेल्या अनेक ग्राहाकांनी असे प्रकार घडत असल्याचे सांगितले.
अशा प्रकारे निकृष्ट व खराब अस्वच्छ मटण विक्री करणाऱ्या या मटण विक्रेत्याची चौकशी करावी. तसेच मटण विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या वजन काट्यांची तपासणी करुन कारवाई करावी. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा सावंत यांनी तहसिलदार व मुख्याधिकारी नगरपंचायत वैभववाडी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी मनसे उपजिल्हाप्रमुख दया मेस्ञी, तुषार चिले, रुपेश वारंग, ज्ञानेश्वर मोरे, विनोद विटेकर, संजय नारकर, जयराम परबते आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा