You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या प्रश्नावर थेट विधानसभा अध्यक्षांनीच दिले शासनाला कारवाईचे निर्देश

आ. वैभव नाईक यांच्या प्रश्नावर थेट विधानसभा अध्यक्षांनीच दिले शासनाला कारवाईचे निर्देश

*आ. वैभव नाईक यांच्या प्रश्नावर थेट विधानसभा अध्यक्षांनीच दिले शासनाला कारवाईचे निर्देश*

*अवैध पर्ससीन,एलईडी मासेमारी प्रश्नावर आ. वैभव नाईक यांनी उठविला आवाज*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पर्ससीन व एलईडी मासेमारी सुरु आहे. त्यावर कारवाई होण्यासाठी पारंपारिक मच्छीमारांनी सातत्याने आंदोलने करूनही त्यांना न्याय मिळालेला नाही.त्यामुळे अवैध मासेमारीवर शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज हिवाळी अधिवेशनात केली. दरम्यान गेल्या तीन अधिवेशनांमध्ये या प्रश्नावर सातत्याने चर्चा झाली आहे. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही. पर्ससीन व एलईडीची मासेमारी रोखण्यासाठी या अधिवेशन काळातच शासनाने कार्यवाही करावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शासनास दिले आहेत.

नागपूर येथे सुरु असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत सुरु असलेल्या अवैध पर्ससीन व एलईडीच्या मासेमारीमुळे स्थानिक पारंपारिक मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अवैधरित्या होणाऱ्या पर्ससीन व एलईडीच्या मासेमारीवर कारवाई व्हावी यासाठी गेली काही वर्षे पारंपारिक मच्छीमार आंदोलने करत आहेत. मात्र अद्यापही शासनाकडून कारवाई झालेली नाही. मच्छीमारांनी अनेक आंदोलने छेडली मात्र अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. अवैध मासेमारीवर शासनाने कडक कारवाई करावी त्याचबरोबर पारंपारिक मच्छीमारांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घेण्यात यावेत अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी सभागृहात केली.
त्यावर बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आ. वैभव नाईक यांनी उपस्थित केलेला प्रश्न योग्य असून सिंधुदुर्गात अवैधरित्या सुरु असलेल्या पर्ससीन व एलईडीच्या मासेमारीमुळे पारंपारिक मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या तीन अधिवेशनात याबाबत सातत्याने चर्चा झाली आहे. मात्र त्यावर कारवाई अद्यापही झालेली नाही. त्यामुळे या अवैधरीत्या होणाऱ्या पर्ससीन व एलईडीच्या मासेमारीवर अधिवेशन काळातच कारवाई करण्यात यावी असे निर्देश त्यांनी शासनास दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 14 =