You are currently viewing उभादांडा समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाचे या हंगामातील पहिले घरटे संरक्षित

उभादांडा समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाचे या हंगामातील पहिले घरटे संरक्षित

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ला उभादांडा सुखटनवाडी समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले समुद्र कासव मादीचे या हंगामातील पहिले घरटे दिसून आले आहे. या घरट्यात अंदाजे 115-120 अंडी असून श्री. बस्ताव बावतीस ब्रीटो, बीच व्यवस्थापक यांनी संरक्षित केलेले आहे.

या अंड्याचा पंचनामा श्री संदिप कुंभार वनक्षेत्रपाल कुडाळ(प्रा.) यांचे उपस्थितीत श्री. सावळा कांबळे वनपाल मठ, श्री. सूर्यकांत सावंत वनरक्षक मठ यांनी केलेला असून कासव अंडी संरक्षण व संवर्धनासाठी आवश्यक मार्गदर्शन स्थानिकांना करण्यात आलेले आहे.

चालू हंगामात मा. श्री नवकिशोर रेड्डी उप वनसंरक्षक सावंतवाडी, व श्री. सुनिल लाड सहायक वन संरक्षक (खा.कू.तो व वन्यजीव) यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजनातून आणि स्थानिक बीच व्यवस्थापक आणि वनकर्मचारी यांच्या मदतीने जास्तीत जास्त समुद्री कासव अंडी संरक्षण व संवर्धन करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. तरी सर्व स्थानिक नागरिक यांना या समुद्री कासव संवर्धनात वन विभागास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा