You are currently viewing “ज्ञानवर्धिनी”विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविते – डॉ अनिशा दळवी

“ज्ञानवर्धिनी”विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविते – डॉ अनिशा दळवी

ज्ञानवर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नर्सिंग इन्स्टिट्यूटचा प्रथम वर्षाचा शपथविधी सोहळा

कणकवली

ज्ञानवर्धिनी संस्था विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवतं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये नियोजन आवश्यक असते. विरळ लोकसंख्या असताना सुध्दा आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळाच्या अभावामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. त्यावेळी जीएनएम मिळत नाहीत तर एएनएम तसेच प्रशिक्षित डाँक्टर उपलब्ध करून जिल्हा रेड झोन मधूनबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले यासाठी परिचारिका स्टाफ हा जिल्हा परिषदचा आहे आणि तो दिवस रात्र मेहनत घेत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. शिक्षण व आरोग्यसाठी काम करत असताना या महामारीमुळे शिक्षण थोडे रेंगाळते आहे पण ते थांबू देणार नाही यासाठी माझा प्रयत्न राहील. स्थानिक पातळीवर भरती प्रक्रियेत आपण दिसला तर मला नक्कीच आवडेल असे प्रतिपादन डॉ अनिशा दळवी यांनी केले.

ज्ञानवर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नर्सिंग इन्स्टिट्यूटचा प्रथम वर्षाचा शपथविधी सोहळा कोरोना चे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती डॉ. अनिशा दळवी उपस्थित होत्या. प्रास्ताविकात अध्यक्ष डॉ अभिनंदन मालंडकर यांनी यावर्षी पासून जी एन एम कोर्स सुरू होतं असल्याचे सांगितले तसेच एम कॉम व बी ए कलीनरी आर्ट (हॉटेल मॅनेजमेंट)कोर्स साठी प्रवेश सुरू झाल्याचे सांगितले द्वितीय वर्ष्याचा विद्यार्थ्यांनी दिशा वर्मा व संजना तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्या सदिच्छा सावंत यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

द्वितीय वर्ष्याच्या विद्यार्थिनींनी नर्सिंग अँथेंम सादर करुन समाजामध्ये कामं करणाऱ्या सर्वं परीचारिकाना अभिवादन केले. शपथ विधी वाचन कासारडे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिचारिका दर्शना धुरे व सुजाता तळेकर यांनी केले कार्यक्रमासाठी संस्थेच्या खजिनदार डॉ. निशा मालंडकर चिटणीस शर्मिला सावंत तसेच हेमंत मालंडकर व पालकवर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रसिद्ध निवेदक निलेश पवार यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − four =