You are currently viewing आरोस येथे रामनवमीनिमित्त ९ एप्रिल ते १८ एप्रिल पर्यंत नाट्यमहोत्सवाचे आयोजन

आरोस येथे रामनवमीनिमित्त ९ एप्रिल ते १८ एप्रिल पर्यंत नाट्यमहोत्सवाचे आयोजन

*आरोस येथे रामनवमीनिमित्त ९ एप्रिल ते १८ एप्रिल पर्यंत नाट्यमहोत्सवाचे आयोजन*

सावंतवाडी

आरोस येथील श्री देव गिरोबा युवक नाट्यमंडळ, आयोजित ९ एप्रिल ते १८ एप्रिल २०२४ पर्यंत श्री देव गिरोबा रंगमंच आरोस,गिरोबावाडी येथे रोज संध्याकाळी ७ वाजता कीर्तन व नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार ९ रोजी रात्री ९.३० वाजता तेंडोलकर दशावतार नाट्य मंडळ,झाराप यांचा ‘ पुण्यप्रभाव ‘ बुधवार १० रोजी रात्री ९.३० वाजता श्री देव मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ,मोरे यांचा ‘ दिप माझ्या वंशाचा ‘ गुरुवार ११ रोजी रात्री ९.३० वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ,चेंदवण यांचा ‘ भक्ती महिमा ‘ शुक्रवार १२ रोजी रात्री ९.३० वाजता श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ,मळगाव यांचा ‘ दुष्यंत शकुंतला ‘ शनिवार १३ रोजी रात्री ९.३० वाजता वाळवेश्वर दशावतार नाट्य मंडळ,तेंडोली ‘ अघोर लक्ष्मी ‘ रविवार १४ रोजी रात्री ९.३० वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ,आरोस दांडेली यांचा ‘ रात्रीस खेळ चाले ‘ सोमवार १५ रोजी रात्री ९.३० वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ,सिंधुदुर्ग यांचा ‘ मीनाक्षी सुंदरेश्वर ‘ बुधवार १७ रोजी दुपारी १२ वाजता रामजन्म रात्री १० वाजता श्री देव गिरोबा युवक नाट्यमंडळ,व प्रविण मांजरेकर दिग्दर्शित सामाजिक नाटक ‘ नटसम्राट ‘ गुरुवार १८ रोजी रात्री ९.३० वाजता कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ,नेरुर यांचा ट्रिकसिनयुक्त नाटक ‘ कालीकंकाली हा नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × two =