You are currently viewing जिल्हा युवा पुरस्कारांसाठी 29 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत

जिल्हा युवा पुरस्कारांसाठी 29 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत

जिल्हा युवा पुरस्कारांसाठी 29 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने सन 2023-24 साठी देण्यात येणाऱ्या  जिल्हा युवा पुरस्कारासाठी 29 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यानी केले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2023-24 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. राज्याचे युवा धोरण -2012  मधील शिफारशीच्या अनुषंगाने शासनाने जिल्हास्तरावर युवा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, समाजातील दुर्बल घटक,  अनुसुचित जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग इत्यादी बाबतचे कार्य, शिक्षण, प्रौढशिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, व्यवनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या इ. बाबत पुरस्कार वर्षापासून गत तीन वर्षात केलेली कामगिरी या पुरस्कारांसाठी विचारात घेतली जाईल. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफीती व फोटो इत्यादी.

            जिल्हास्तरावर एक युवक व एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना पुरस्कार देण्यात येईल. पुरस्कार गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रु. 10,000/- (प्रति युवक व युवतीसाठी) गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रु.50,000/- (एका संस्थेसाठी ) अशा स्वरुपाचा असेल. जिल्ह्यातील युवा अथवा पात्र नोंदणीकृत संस्थांनी आपले अर्ज विहीत नमुन्यात भरुन योग्य कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे दि. 29 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करावा. विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

या कार्यालयाकडून प्रस्तावासह जोडवयाच्या कागदपत्रांची माहिती, विहीत नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी www.dsosindhudurg.blogspot.in  किंवा कनिष्ठ लिपिक पंढरीनाथ चव्हान 7744834122 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग मुख्य प्रशासकीय इमारत सिंधुदुर्गनगरी येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा