You are currently viewing कलंबिस्त हायस्कूल येथे २ व ३ डिसेंबर कालावधीत तालुकास्तरीय ५१ वे विज्ञान प्रदर्शन 

कलंबिस्त हायस्कूल येथे २ व ३ डिसेंबर कालावधीत तालुकास्तरीय ५१ वे विज्ञान प्रदर्शन 

सावंतवाडी :

 

कलंबिस्त हायस्कूल येथे शनिवार २ व रविवार ३ डिसेंबर या कालावधीत सावंतवाडी तालुकास्तरीय ५१ वे विज्ञान प्रदर्शन  आयोजित करण्यात आले आहे. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला रविवार तीन डिसेंबरला सकाळी ११ वाजता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले गटशिक्षणकारी वासुदेव नाईक संस्था अध्यक्ष शिवाजी सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.

या विज्ञान प्रदर्शनात दोन गटात विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन निबंध वकृत्व प्रश्नमंजुषा आधी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथमच ग्रामीण स्तरावर हे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कलंबिस्त येथे होत आहे. निबंध स्पर्धा लहान गट सावित्री आठवी विषय सुदृढ आरोग्याची गुरुकुल्ली सकसहार व योगा प्राणायाम शब्द मर्यादा ३०० पर्यावरणातील बदलाचे वातावरणातील दुष्परिणाम आधुनिक शेती व शाप की वरदान मोठा गट नवी ते बारावी दळणवळणाची प्रगती वाहतूक परिणाम त्यामुळे झालेले फायदे व परिणाम दोन बदलत्या जीवनशैलीचे आरोग्यावर होणारे परिणाम रोखण्यासाठी उपाययोजना शब्द मर्यादा ३०० शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा भरगोस उत्पन्नासाठी होणारा उपयोग वकृत्व स्पर्धा लहान गट सहा ते आठ इयत्ता आरोग्याची गुरुकुल्ली सकळ योगा व प्राणायाम सात मिनिटे पर्यावरणातील बदलाचे वातावरणातील दृश्य परिणाम आधुनिक शेती व शाप की वरदान मोठा गट नवी ते बारावी दळणवळणाची प्रगती वाहतुकीचा परिणाम त्यामुळे झालेले फायदे व परिणाम बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर होणारा परिणाम रोखण्यासाठी उपाययोजना सात मिनिटे शेतातील आधुनिक तंत्राचा भरगोस उत्तरासाठी होणारा उपयोग या विषयावर स्पर्धा होणार आहे प्रश्नमंजुषा सहावी ते आठवी लहान गट मोठा गट नवी ते बारावी शालेय अभ्यासक्रमावर आधारित प्रदर्शनीय वस्तू व प्रतिकृती व वैज्ञानिक प्रकल्प सहावी ते आठवी व नवी ते बारावी आरोग्य जीवन शेती कृषी दळण आणि वाहतूक संगणकीय विचार आधी कार्यक्रम होणार आहेत. शनिवार दोन डिसेंबरला सकाळी नऊ ते दहा उपस्थिती प्रातिकृती मांडणी सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० प्रश्नमंजुच्या स्पर्धा दुपारी ३१ ते २:३० भोजन दुपारी दोन तीस ते सायंकाळी चार तीस वकृत्व स्पर्धा आणि शनिवारी सकाळी ११ वाजता उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सकाळी बारा ते दुपारी एक निबंध स्पर्धा सकाळी १०:३० ते २:३० विज्ञान प्रातिकृती परीक्षण दुपारी ३१ ते २:३० भोजन दुपारी तीन ते पाच बक्षीस वितरण समारोप आधी कार्यक्रम होणार आहेत तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके व शाळेचे मुख्याध्यापक श्री अभिजीत जाधव यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा