You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतीकृतींचे मळगावात प्रदर्शन…..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतीकृतींचे मळगावात प्रदर्शन…..

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र-विभाग सिंधुदूर्गचे आयोजन

सावंतवाडी
दीपावलीच्या पार्श्‍वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र- विभाग सिंधुदूर्गच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतीकृतींचे प्रदर्शन मळगाव येथे भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन १९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. शिवप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे. या प्रदर्शनात मनोहरगड, सिंधुदूर्ग किल्ला, मनसंतोषगड, सर्जेकोटगड, रांगणागड, भरतगड, रामगड, पारगड, हनुमंतगड, विजयदुर्ग किल्ला, देवगड किल्ला आदी किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रदर्शनाचा शुभारंभ मळगाव येथील ज्येष्ठ नागरिक मनोहर राऊळ व सुभाष नाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. शरद शिरोडकर, विनायक राऊळ, उदय सावळ, निवास नाटेकर, आयोजक सुनील राऊळ, ज्ञानेश्वर राणे, निलेश नाटेकर, प्रज्योत खडपकर, शुभम खडपकर, रितेश राऊळ, सुधीर राऊळ, शुभम देऊलकर, चैतन्य नाटेकर, मनिष नाटेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 3 =