You are currently viewing सिंधुदुर्गनगरी येथे अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा

सिंधुदुर्गनगरी येथे अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा

सिंधुदुर्गनगरी येथे अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा

प्रतिनिधी / ओरोस

अल्पसंख्याक हक्क दिन हा देशातील धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची वचनबद्धता दर्शवणारा दिवस आहे. अल्पसंख्याकांचे हक्क आणि त्यांचे संरक्षण करण्यात लक्षणीय प्रगती झाली असली तरी आव्हाने कायम आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार, समाज आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करावे असे आवाहन कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक हुमायुम मुरसुल यांनी केले आहे.

अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सर्वसमावेशकता, समानता आणि गैर-भेदभाव यांना प्रोत्साहन देण्यासाठी १८ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय अल्पसंख्यांक दिवस म्हणून साजरा केला जातो. केंद्र सरकारने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा 1992 अंतर्गत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना केली असून राजपत्रात मुस्लिम, शीख, बौद्ध, ख्रिश्चन जैन आणि झोरोस्ट्रियन या समुदयांचा समावेश करण्यात आला. अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण या आयोगा द्वारे केले जाते.

सिंधुदुर्ग नगरी येथील पत्रकार भवन येथे अल्पसंख्यांक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक हुमायुम मुरसुल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला. यावेळी उप जिल्हाधिकारी रविंद्र मठपती, मुराद नाईक, अड संदीप निंबाळकर, मुस्लिम समाज प्रतिनिधी अड अशपाक शेख, ख्रिश्चन समाज प्रतिनिधी विक्टर डॉन्टस, जैन धर्माचे प्रतिनिधी डॉ दीपक तुपकर, बॉ द्ध धर्माचे प्रतिनिधी सूर्यकांत कदम, निसार शेख, निसार काझी, शाहनवाज शहा , डॉ. अस्मा ठाकूर, रफीक मेमन, शरफुद्दिन बोबडे, मोहम्मद रफीक महेश परुळेकर यांच्यासह विविध अल्पसंख्यांक समुदाय नागरिक उपस्थित होते.

काही ठिकाणी अल्पसंख्यांकांना अजूनही भेदभावाची वागणूक दिली जाते . शिवाय शैक्षणिक असमानता, धार्मिक असमानता दूर करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती, त्यांच्या धार्मिक किंवा भाषिक अस्मितेकडे दुर्लक्ष करून, देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनात पूर्णपणे सहभागी होऊ शकेल असे वातावरण निर्माण करणे आवश्यक असल्याचे विविध वक्त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांसह सर्व नागरिकांना अनेक मूलभूत अधिकारांची हमी दिली आहे. त्यानुसार अल्पसंख्याकांना त्यांची वेगळी भाषा, लिपी किंवा संस्कृती जतन करण्याचा अधिकार देऊन त्यांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांचे संरक्षण केले असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले..

भेदभाव आणि पूर्वग्रह
धार्मिक किंवा भाषिक ओळखीवर आधारित भेदभाव हा एक व्यापक मुद्दा आहे. अल्पसंख्याकांना अनेकदा पूर्वग्रह, पक्षपाती आणि रूढीवादी गोष्टींचा सामना करावा लागतो ज्यामुळे त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला अडथळा निर्माण होतो याबाबत खंत व्यक्त करण्यात आली. धार्मिक असहिष्णुता आणि सांप्रदायिक हिंसाचाराच्या घटनांमुळे काही वेळा अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो याकडेही लक्ष वेधण्यात आले.
आर्थिक उपेक्षितीकरण , राजकीय अंडरप्रेझेंटेशन दूर होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग बरोबरच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा याबाबत माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले. प्रास्ताविक एड. रईस पटेल यांनी तर आभार मुरादअली शेख यांनी मानले.

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

फोटो
अल्पसंख्यांक दिवस कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्राध्यापक हुमायुम मुरसुल. सोबत अन्य.

प्रतिक्रिया व्यक्त करा