You are currently viewing वेंगुर्ले- रामघाट येथे विजेच्या तारा पेटल्या…

वेंगुर्ले- रामघाट येथे विजेच्या तारा पेटल्या…

वेंगुर्ले

वेंगुर्ले रामघाट येथील बबलू आडेलकर यांच्या घरासमोरून ११ केव्ही विजेच्या तारा जातात. या तारा अचानक पहाटे ४.३० वाजता आग लागून पेटताना दिसल्या. त्यामुळे तत्काळ याची कल्पना बबलू आडेलकर यांनी ग्रां. स. हेमंत गावडे व संजय परब यांना दिली. लगेच त्यांनी वीज वितरणच्या वेंगुर्ले कार्यालयात धाव घेतली आणि तेथील कर्मचाऱ्यांना कळविले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेऊन लगेच तेथील वीजपुरवठा खंडित केला. परिणामी तारेला लागलेली आग आटोक्यात आली आणि होणारे मोठे नुकसान टळले.

प्रतिक्रिया व्यक्त करा