You are currently viewing ध्येयवेडा कुलगुरू स्व. डॉ. दिलीप मालखेडे………

ध्येयवेडा कुलगुरू स्व. डॉ. दिलीप मालखेडे………

*ध्येयवेडा कुलगुरू स्व. डॉ. दिलीप मालखेडे……………*

 

मला आजही आठवतो दोन वर्षांपूर्वीचा विद्यापीठ परिसरातील एक रविवार दिवस,असं वाटते की ती काल परवाचीच गोष्ट आहे. मी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू विद्यार्थी प्रिय व्हिजन मॅन स्व.डॉ दिलीप मालखेडे यांना भेटावयास त्यांच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या निवासस्थानी गेलो होतो.सर अमरावतीला आल्यापासून अशी रितसर भेट झाली नव्हती. सर फार पूर्वी अमरावतीला प्राध्यापक असताना माझ्याकडे जिजाऊ नगरातील घरी येऊन गेले होते .सौ वहिनीसाहेब देखील आमच्या महापौरांच्या बंगल्यासमोरील जिजाऊ नगरातील घरी येऊन गेल्या होत्या. दरम्यान त्या वेळी एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली आणि त्यांनी आठवण ठेवून भेटायला या असे निमंत्रण दिले. मी एका रविवारी कुलगुरू साहेबांच्या बंगल्यावर पोहोचलो. तेथील कार्यालय कर्मचाऱ्यांनी आम्हाला बंगल्यातील कार्यालयात बसविले .मी माझे व्हिजिटिंग कार्ड त्या कर्मचाऱ्याजवळ दिले आणि कुलगुरू साहेबांची वाट पाहत बसलो. खरं म्हणजे दिवस रविवार होता. सुट्टीचा दिवस .आरामाचा दिवस .पण साहेबांचा स्वभाव मला माहीत होता. त्यामुळेच मी रविवारी त्यांच्या निवासस्थानी जाण्याचे धाडस केले. साहेब आराम करीत होते .कर्मचाऱ्यांनी त्यांना काठोळे सर आलेले आहेत. कार्यालयात वाट पाहत आहेत. असा निरोप दिला.साहेबांना निरोप मिळताच साहेब घरच्या साध्या पोशाखामध्ये कार्यालयात आले .माझ्याबरोबर प्रा. प्रवीण खांडवे सर सुद्धा होते .मी त्यांना आमच्या पुढील कार्यक्रमाचे निमंत्रण दिले .आणि रविवारी तुमच्या निवासस्थानी आल्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. आम्ही जवळपास एक तास कुलगुरू साहेबांशी चर्चा केली आणि हे चर्चा करीत असताना आमच्या लक्षात आलं की या विद्यापीठातील मुलांसाठी प्राध्यापकांसाठी प्राचार्यांसाठी खूप काही करण्याची त्यांची इच्छा आहे. काही नावीन्यपूर्ण उपक्रम त्यांनी त्यावेळी आम्हाला सांगितले .विद्यार्थ्यांनी भारताच्या नव्हे जगातही आपला अभ्यासक्रम काही प्रमाणात पूर्ण करून उर्वरित विद्यापीठ परिसरात संबंधित महाविद्यालयात राहून त्याने पूर्ण केला तर अशा विद्यार्थी युवकालाही विद्यापीठातर्फे पदवी देण्याची त्यांची संकल्पना खूपच चांगली वाटली. अनेक वेळा मुले पदव्या घेतात परंतु त्यांचे प्रॅक्टिकल नॉलेज त्यांच्याजवळ नसते .त्यांचा तेवढा सराव झालेला नसतो ,मग अशा वेळेस आपली मुले पुण्या मुंबईच्या मुलांच्या तुलनेत कमी पडतात .अमरावतीचे शासकीय महाविद्यालय आणि पुण्याचे शासकीय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग यामध्ये जमीन असमानचा फरक आहे. पुण्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पाहिले म्हणजे अभियांत्रिकी शाखेची भव्यता लक्षात येते. दूरदृष्टी लक्षात येते .तिथली त्यांची सामग्री पाहिली म्हणजे डोळे दिपून जातात. ते सर्व अमरावतीला येईल तेव्हा येईल. पण माझा मुलगा जर त्याच्या अभ्यासक्रमाशी संबंधित काही भाग कुठल्या औद्योगिक क्षेत्रात कुठल्या दुसऱ्या विद्यापीठात किंवा सार्वजनिक क्षेत्रात काही प्रमाणात तो पूर्ण करत असेल आणि उर्वरित अभ्यासक्रम तो अमरावती विद्यापीठाच्या कक्षेत पूर्ण करत असेल तर त्याला पदवी देण्यासाठी विद्यापीठाची दारे त्यांनी उघडी करून दिलेली होती व ही एक फार मोठी उपलब्धी होती.अनेक विद्यार्थ्यांच्या जवळ लोकांजवळ कौशल्य असते परंतु पदवी नसते .याचे चांगले उदाहरण द्यायचे म्हणजे जाधव उद्योग समूहाचे जनक श्री गुलाबराव जाधव यांचे देता येईल .ते जाधव उद्योग समूहाचे पितामह .त्यांनी मॅट्रिकची ही परीक्षा कधी दिली नाही .पण आज एवढा मोठा उद्योग समूह उभारला. अशा व्यक्तीला जर विद्यापीठाने सन्मानित केले तर त्या व्यक्तीबरोबरच विद्यापीठाचा देखील गौरव होऊ शकतो आणि हीच संकल्पना त्यांनी डोळ्यासमोर ठेवून या योजनेची आखणी केली होती . कुलगुरू रविवारी देखील काम करतात. हे आमच्या प्राध्यापक मंडळींनी प्राचार्य मंडळींनी आणि विद्यार्थी मंडळींनी लक्षात ठेवले पाहिजे. मला त्यांचे कर्मचारी सांगत होते सर उशिरापर्यंत विद्यापीठाच्या कार्यालयात बसतात .अनेक कामे पेंडिंग असतात. त्यांचा झिरो पेंडंसीवर अधिक विश्वास असतो. अशा कामांचा ते निपटारा करतात. या भेटी दरम्यान आम्ही बोलत असतानाच विद्युत लाईन गेली .त्यांनी लगेच आपल्या मोबाईल मधील लाईट सुरु केला आणि आम्हाला त्यांच्या दारापर्यंत सोडले. खऱ्या अर्थाने श्री संत गाडगेबाबा यांच्या विचारांना वाहिलेलं एक व्यक्तिमत्व आमच्या विद्यापीठाला कुलगुरू म्हणून लाभले होते हे खरोखरच आपल्या विभागासाठी भूषणावह बाब होती. आपणास फक्त एकच विनंती करावीशी वाटते की आमच्या विद्यापीठ क्षेत्रात येणाऱ्या प्राचार्यांनी,प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी स्व.डॉ. दिलीप मालखेडे यांचा तंतोतंत आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर काम केले तर त्यांना ही खरी आदरांजली ठरेल. या चांगल्या गुणतत्वाचा अंमल केल्यास एक दिवस अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी या जगात नाव कमाविल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री आहे ही वातावरण निर्मिती स्व डॉ. मालखेडे साहेबांनी अमरावती विद्यापीठात सुरु केली होती त्याला सर्व विभागातून उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळत गेला.हा पायंडा जर असाच कायम राहला तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात गेला तरी तो हमखास निवडला जाईल .आम्ही सरांच्या या उपक्रमात आमचा सहभाग तेव्हा ही दर्शविला होता व आजही आम्ही सहमत आहोत.आपण देखील त्यांच्या सकारात्मक उपक्रमात सहभागी होऊन आपल्या खारीचा वाटा उचलावा अशी अपेक्षा होती आहे व राहिलही. त्यांच्या अशाच यथार्थ कार्यगुणावर आधारित ध्येयवेडा कुलगुरू या नावाने माझे विद्यार्थी मित्र डॉ. मनीष शंकर राव गवई यांनी एक पुस्तक लिहिले आहे. त्याचे प्रकाशन आज दि २४ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या सभागृहात दुपारी एक वाजता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालक मंत्री मा ना.चंद्रकांत दादा पाटील यांचे हस्ते संपन्न होणार आहे. या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा…. ==============

प्रा *.डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी .अमरावती कॅम्प.9890967003*

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − four =