‘डॉक्टर्स डे’ चं औचित्य साधून माऊली स्पोर्ट्स क्लब वरची भुईवाडाच्या वतीने डॉ. मयूर गोसावी यांचा सत्कार

‘डॉक्टर्स डे’ चं औचित्य साधून माऊली स्पोर्ट्स क्लब वरची भुईवाडाच्या वतीने डॉ. मयूर गोसावी यांचा सत्कार

 

डॉक्टर्स डे च औचित्य साधून आज दिनांक 01 जुलै 2021 रोजी *माऊली स्पोर्ट्स क्लब भुईवाडा (वरचीवाडी)* च्या वतीने *डॉ मयूर गोसावी* यांचा सत्कार करण्यात आला. घावनळे/तूळसुली/केरवडे/मांडकुली आणि पंचक्रोशीत गेल्या काही वर्षा पासून डॉक्टर आपली सेवा देत आहेत.

विशेषत: गेल्या दोन वर्षात कोरोना आजारात त्यांनी खुपच मोलाची कामगिरी करून अनेक जणांचे जीव वाचवले. अशा ह्या कोविड योद्धाचा आज *माऊली स्पोर्टस क्लबच्या* वतीने शाल, श्रीफळ आणि मंडळाचे स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री जनार्धन कास्टे, सचिव श्री बाबी भिंगारे, खजिनदार श्री भूषण राणे,  सह-खजिनदार श्री गोटया राणे, मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते श्री शिवाजी ठाकूर, राजू राणे, सुरज सावंत, अजय सावंत,स्वप्नील धुरी, बाळू राणे आणि योगेश सावंत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा