You are currently viewing कणकवली सिद्धार्थनगर येथे सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन

कणकवली सिद्धार्थनगर येथे सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन

कणकवली

कणकवली सिद्धार्थनगर येथे असलेल्या आंबेडकर भवन जवळ सभामंडप उभारणे या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तेथील स्थानिक ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. या कामाकरिता नगरपंचायत च्या माध्यमातून 42 लाख 36 हजार 817 चा निधी मंजूर करण्यात आला आहे.

गेले अनेक दिवस सिद्धार्थनगर येथील नागरिकांची असलेली मागणी हे काम मंजूर झाल्यामुळे पूर्ण झाली आहे. या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेविका सुप्रिया नलावडे, उर्वी जाधव, मेघा गांगण, नगरसेवक रवींद्र गायकवाड, ऍड. विराज भोसले, प्रतीक्षा सावंत, शिशिर परुळेकर, बाळा पाटील, बाळा सावंत, माजी नगरसेवक बंडू गांगण, गौतम खुडकर, संजीवनी पवार, भाई जाधव, अरुण जाधव, श्रीमती. हिंदळेकर, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा