रामनाथ मोते यांचे अल्पशा आजारांने निधन
रामनाथ मोते यांचे अल्पशा आजारांने निधन

रामनाथ मोते यांचे अल्पशा आजारांने निधन

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार
रामनाथ मोते यांचे अल्पशा आजारांने निधन
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे लोकप्रिय मा.आमदार तसेच आपल्या संस्थेचे मार्गदर्शक, आधारस्तंभ रामनाथ दादा मोते यांचे अल्पशा आजारांने आज सकाळी निधन झाले आहे. त्यांनी आपल्या संस्थेसाठी भरीव योगदान दिले होते. शिवाय संस्थेच्या वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलनात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली होती. त्यांचे आकस्मिक निधनाने आम्ही एका उत्कृष्ट मार्गदर्शकांस अंतरलो आहोत.
तसेच सावंतडीचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद शिरसाट यांचे अल्पशा आजारांने आज सकाळी सावंतवाडी येथे निधन झाले आहे. त्यामुळे एका संवेदनशील पत्रकारांस संस्था कायमस्वरूपी मुकली आहे. मोते सरांच्या व शिरसाट यांच्या परीवाराच्या दुखा:त संस्था व त्यांचे पदाधिकारी सहभागी आहेत.
मृतात्म्यांस सद्गती व शांती मिळो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
कार्यकारी मंडळ,डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ, मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा