You are currently viewing बांदा ग्रामपंचायत मौनावस्थेत, सर्वसामान्य नागरीक मात्र गैरसोयीने हैराण

बांदा ग्रामपंचायत मौनावस्थेत, सर्वसामान्य नागरीक मात्र गैरसोयीने हैराण

*बांदा ग्रामपंचायत मौनावस्थेत, सर्वसामान्य नागरीक मात्र गैरसोयीने हैराण.*

बांदा

सध्या बांदा येथे महामार्गावरील मुख्य चौकात फ्लायओव्हरचे काम चालु आहे. आज येथील सजग नागरीक व सामाजिक कार्यकर्ते यांचेकडुन या कामातील बेपर्वाई व नियोजनशून्य कामाबद्दल बांदा ग्रामपंचायतकडे खरपुस शब्दात निवेदन देण्यात आले.
दोन्ही बाजुकडील साईडरोडचे काम पुर्ण न करता फ्लायओव्हरचे काम सुरू करणे, वर्दळीच्या रस्त्यावर चिखलयुक्त पाणी सोडणे, बांधकाम चालु असलेल्या गटाराच्या कॉक्रीटवर पाणी न मारणे, गटारांना ड्रेनेज पाईप न टाकणे, सिग्नल यंत्रणा, रम्बल्स, दिशादर्शक फलक न लावणे, धुळमातीच्या रस्त्यावर पाणी न मारणे, सटमट अंडरपासच्या कामा ठीकाणी असलेल्या स्थानिकांच्या प्रश्नावर काहीही तोडगा न काढणे अशा अनेक प्रश्नांवर ग्रामपंचायत प्रशासनास धारेवर धरण्यात आले.
सदर ठीकाणी सरपंच यांचे स्वतःचे व्यवसायाचे ठीकाण असुन रोज त्या येथुन जातात, परंतु कोणतीही कार्यवाही करत नाहीत हे देखील अनाकलनीय असल्याचे यात म्हटले. सत्ताधारी व विरोधक असे दोन्ही बाजुचे सदस्य याबाबत मौन बाळगुन का आहेत ?? यात काही वेगळे व्यवहार तर दडले नाहीत ?? अशी शेकाही उपस्थित करण्यात आली.
सदर निवेदनाची बांदा शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. सदर निवेदन श्री. गुरु कल्याणकर, श्री.हेमंत दाभोळकर, श्री. निलेश सावंत यांचेकडुन देण्यात आले. आतातरी ग्रामपंचायत आपले मौनव्रत सोडेल व झोपेतुन जागे होऊन आपले कर्तव्य पार पाडेल अशी अपेक्षा यांचेकडुन व्यक्त करण्यात आली.

*संवाद मीडिया*

*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*
*🏘️ A to Z बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*

*प्रोप्रा – राजू मानकर*

*संपर्क 👇*
*📲 मो.9422435601 | 9225784966 | 9561344739*

*💫चिरा, वाळू, खडी, स्टील, सिमेंट, विटा, डबर योग्य दरात मिळेल. काँक्रीट हाॅट मिक्सर, रोड रोलर, जे.सी.बी. जॅक, स्पॅन भाड्याने मिळेल*

*💫सेंट्रींग प्लेट मिळतील.*

*🚰बांधकामासाठी लागणारे पाणी कामावर पोच मिळेल.*

*💫🚗 🚚कार व टेम्पो भाड्याने मिळेल*

*🏡आर.सी.सी. व लोड बेअरींग बंगल्यांची कामे करून मिळतील.*

*🏬सना कॉम्प्लेक्स, आचरा रोड, पोस्ट ऑफिस समोर, कणकवली*

*☎️ ऑफिस*
*9604180156 / 7350288777*
*9225784966*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 3 =