You are currently viewing इकोफ्रेंडली नरकासूर स्पर्धेत मालवण वायरीच्या रेकोबा मित्रमंडळाचा प्रथम क्रमांक

इकोफ्रेंडली नरकासूर स्पर्धेत मालवण वायरीच्या रेकोबा मित्रमंडळाचा प्रथम क्रमांक

मालवण :

 

नरक चतुर्दशीच्या निमित्ताने मालवणात सलग दुसऱ्या वर्षी सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने भरविण्यात आलेल्या इकोफ्रेंडली नरकासूर स्पर्धेला मालवण शहर आणि परिसरातील नरकासूर साकारणाऱ्या विविध बाळगोपाळ मंडळ व तरुण मित्रमंडळाने उदंड प्रतिसाद दिला. मालवण भरड तारकर्ली नाक्यावर रसिकांच्या उदंड प्रतिसादात पार पडलेल्या या स्पर्धेत खुल्या गटात मालवण वायरीच्या रेकोबा मित्रमंडळाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला तर लहान गटात देऊळवाडा बॉईज ग्रुपने प्रथम क्रमांकावर आपला हक्क प्रस्थापित केला . या स्पर्धेचे या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे नरकासूर प्रतिमां बरोबरच श्रीकृष्णाची वेशभूषा धारण करून श्रीकृष्ण कथा सादरीकरणाला प्राधान्य देण्यात आले होते. दरम्यान, स्पर्धक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून पूढील वर्षीही इको फ्रेंडली धर्तीवरच अधिक भव्य दिव्य प्रमाणात स्पर्धा घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्य आयोजक सौरभ ताम्हणकर यांनी केली . दिवाळीत नरक चतुर्दशी निमित्त मालवणात दरवर्षी भव्य अशा नरकासुर प्रतिकृती तयार करून त्यांचे दहन केले जाते. या पार्श्वभूमीवर मालवण मध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने प्रथमच इको फ्रेंडली धर्तीवर नरकासुर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने शनिवारी मध्यरात्री मालवण मध्ये नरकासुर स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. अगदी १ फुटा पासून १५ फुटापर्यंतचे नरकासुर या स्पर्धेत साकारण्यात आले होते. पर्यावरणाचं संतुलन आज काळाची गरज बनली आहे. त्यामुळे प्लास्टिक, थर्माकोलचा वापर टाळून तयार केलेले नरकासुर यावेळी पाहायला मिळाले. काही मंडळानी देखाव्यासह हालते नरकासुर तयार केले होते. या स्पर्धेला मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून लहान गटात २० तर खुल्या गटात १४ मंडळानी सहभाग घेतला. या स्पर्धेत लहान गटामध्ये प्रथम क्रमांक – देऊळवाडा बॉईज या मंडळाने पटकाविला तर द्वितीय क्रमांक – महापुरुष देऊळवाडा मंडळ तर तृतीय क्रमांक – कोळंब बॉईज या मंडळाने मिळविले तसेच मोठ्या गटामध्ये १४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यामध्ये प्रथम क्रमांक – रेकोबा मित्रमंडळ वायरी या मंडळाने तर द्वितीय क्रमांक – ईस्वटी महापुरुष देऊळवाडा यांनी मिळविले तसेच तृतीय क्रमांक – महापुरुष रेवतळे यांनी मिळविले त्याचप्रमाणे धुरीवाडा बॉईज, राजकोट बॉईज, दांडी बॉईज यांना विशेष पारितोषिके देण्यात आली या स्पर्धेचे सुत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सौरभ ताम्हणकर यांच्यासह राकेश सावंत, चंद्रकांत मयेकर, तुषार वाघ, निशय पालेकर, गौरव लुडबे, प्रतीक कुबल, प्रतीक आचरेकर, प्रणव आचरेकर, फ्रँसिस फर्नांडिस, बंड्या पराडकर, प्रशांत गवंडी, अथर्व सावजी, तन्मय पराडकर, आदित्य मोर्जे, कुणाल खानोलकर यांनी अथक परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − three =