You are currently viewing रेखाकला स्पर्धेत बांदा येथील व्ही. एन.नाबर शाळेचे घवघवीत यश.

रेखाकला स्पर्धेत बांदा येथील व्ही. एन.नाबर शाळेचे घवघवीत यश.

रेखाकला स्पर्धेत बांदा येथील व्ही. एन.नाबर शाळेचे घवघवीत यश..

बांदा

कला संचलनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षा (इंटरमिजीएट) सन २०२३-२४ चा व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल चा निकाल प्रतिवर्षीप्रमाणे १००% लागला आहे.या परीक्षेस २६ विद्यार्थी प्रविष्ठ झाली होती. त्यातील १३ विद्यार्थी B श्रेणीत तर १३ विद्यार्थी C श्रेणीत उत्तीर्ण झाले.तसेच शासकीय रेखाकला परीक्षा ( एलिमेंटरी ) सन २०२३-२०२४ चा या शाळेचा निकाल प्रतिवर्षीप्रमाणे १०० % लागला आहे. या परीक्षेस १६ विद्यार्थी प्रविष्ठ झाली होती. त्यातील ०७ विद्यार्थी B श्रेणीत तर ०९ विद्यार्थी C श्रेणीत उत्तीर्ण झाले.

शाळेचे कला शिक्षक हर्षद खडपकर यांचे या मुलांना मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका सौ.मानली देसाई यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 19 =