You are currently viewing दीविजा वृध्दाश्रमात विद्यामंदिरच्या मुलांनी साजरी केली प्रदूषणमुक्त दिवाळी

दीविजा वृध्दाश्रमात विद्यामंदिरच्या मुलांनी साजरी केली प्रदूषणमुक्त दिवाळी

दीविजा वृध्दाश्रमात विद्यामंदिरच्या मुलांनी साजरी केली प्रदूषणमुक्त दिवाळी

कणकवली
कणकवली येथील विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी स्वस्तिक फाऊंडेशनच्या असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात भेट देउन प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी केली. विद्यामंदिर शाळेतील शिक्षक प्रसाद राणे व शिक्षिका सौं. शर्मिष्ठा केळुस्कर यांनी विद्याथ्यांना दिविजा वृद्धाश्रमात नेऊन प्रदूषण मुक्त दिवाळी हा उपक्रम राबविला.

या उपक्रमानिमित्त या विद्यार्थ्यांनी या वृध्दाश्रमातील आजी आजोबासाठी भेट कार्ड बनवून आणली, काही विद्यार्थीनी गीते सादर केली तर काहींनी फराळ व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. यावेळी प्रसाद राणे यांनी आश्रम संकल्पना काय असते या विषयी माहिती दिली. विद्यार्थी व शिक्षकांनी आजी आजोबांचे पाद्यपुजन करून ओवाळनी केली. एक उत्तम संस्कार शिक्षकांनी या विद्यार्थ्याना यानिमित्ताने आश्रमात शिकवला. तर यावेळी दिविजा वृद्धाश्रमाच्या संचालकांनी आश्रमाची माहिती दिली.

आजी आजोबा नातवंडे भेटायला आल्यामुळे खूप भारावून गेले. विद्यामंदिर शाळेने प्रदूषण मुक्त दिवाळी हा राबवलेला उपक्रम खरंच प्रशंसनीय आहे. यावेळी शाळेचे प्रसाद राणे, सौ. शर्मिला केळुसकर, विद्या शिरसाट, श्रीमती आर. आर. कदम, श्रद्धा लिमये, कर्मचारी अरुण इंगळे आणि पालक उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*पाहिजेत..पाहिजेत.. पाहिजेत…!*

*अकाउंट : TALLY व पदवीधर आवश्यक.*

*सेल्समन : पदवीधर आवश्यक*

*आकर्षक पगार*

**स्थानिकांना प्राधान्य**

*संपर्क*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114207/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा