आचरा शेतमाळावर लागलेल्या आगीत आंबा कलमबागा जळून खाक

आचरा शेतमाळावर लागलेल्या आगीत आंबा कलमबागा जळून खाक

आचरा

आचरा शेतमाळावर रविवारी दुपारच्या सुमारास आग लागली होती. सोसाट्याचा वारा असल्याने ही आग शेतमाळावर पसरली. आगीने रौद्ररुप धारण केले होते. या आगीत आंबा कलमबागा भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

ऐन आंबा हंगामात धरलेली आंब्याची कलमे आगीत जळून गेल्याने शेतकऱ्यांची हानी झाली आहे. आग लागल्याचे समजताच आचरा देऊळवाडीतील ग्रामस्थांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही बागा वाचविण्यात यश आले. ही आग आचरा शेतमाळावर पसरत चालली होती.

आचरा येथील स्थानिक ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून मिळेल त्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालू केले होते.

आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशांत घाडी, परेश सावंत, उदय बापर्डेकर, अक्षय घाडी, आकाश घाडी, अजय घाडी, संकेत घाडी, भाऊ घाडी, नितीन घाडी, धोंडू घाडी, सुधीर घाडी, चंद्रकांत घाडी, चंद्रसुहास घाडी, उदय घाडी, रवींद्र घाडी यांनी प्रयत्न केले. संपदा आचरेकर, तन्वी आचरेकर, दिशा आचरेकर या मुलींनी बोअरिंगचे पाणी आणून देत आग आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे पाण्याचा मारा सुरू करीत आगीवर ताबा मिळवित इतर बागांचे होणारे मोठे नुकसान त्यामुळे टळले.

सुकलेल्या गवतामुळे आगीचे रौद्ररुप

रविवारी दुपारच्या सुमारास आचरा शेतमाळावर अचानकपणे आग लागली. विलास घाडी, चंद्रकांत घाडी यांची धरलेली आंबा कलमे, अरविंद सावंत यांची लहान आंबा कलमे जळून गेली. यात घाडी कुटुंबाची आंबा कलमे जळून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात बांबूची बेटेही आगीत खाक झाली. जोरदार वाऱ्यामुळे आणि सुकलेल्या गवतामुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा