You are currently viewing ओव्हरलोड चिरे वाहतूक करणारा डंपर गावराई येथे पलटी..

ओव्हरलोड चिरे वाहतूक करणारा डंपर गावराई येथे पलटी..

सिंधुदुर्गनगरी :

 

मालवण तालुक्यातील हेदुळ येथून चंदगडकडे जाणारा ओव्हरलोड चिरे वाहतूक करणारा डंपर गावराई देऊळवाडी येथील वळणावर आज सकाळच्या सुमारास पलटी झाला. भरधाव वेगाने रस्त्याच्या वळणाचे भान न ठेवता चालकाने डंपर चालविल्याने हा अपघात घडला. सुदैवाने जीवितहानी नाही. गावराई रस्त्यावर अवैध, ओवरलोड चीरे वाहतूक होत असल्याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी ग्रामस्थांनी तक्रारी करूनही याची दखल घेण्यात आली नाही. यापूर्वीही असा अपघात होऊन डंपर पलटी झाला होता. त्यावेळी मोटर सायकलस्वार सुदैवाने वाचला होता. आज झालेला अपघात एका घरानजिक घडला. सुदैवाने डंपर घरात घुसला नाही अन्यथा अनर्थ घडला असता. याला जबाबदार कोण? याबाबतचा न्याय कुणाकडे मागावा असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.

कुडाळ तालुक्यातील गावराई येथे सकाळीच्या दरम्यान डंपर हेदूळ येथून चिरे घेऊन गावराई सडा रस्त्यावरून सुकळवाडच्या दिशेने येत होता. धनगरवाडी उताराच्या रस्त्यावर चालकाने ५०० हुन अधिक चीरे भरलेला डंपर सुसाट वेगाने सोडून दिल्यामुळे वळणावर चालकचा ताबा सुतल्याने हा अपघात घडला. सुदैवाने या रस्त्यालगत असलेल्या घरामध्ये घुसला नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडून जीवितहानी होण्याची शक्यता होती. तसेच या डंपर मध्ये कोणी अन्य व्यक्ती नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. चीरे वाहतूक करणाऱ्या डंपरला रितसर महसुल विभागाचा परवाना घेणे आवश्यक आहे. परंतु सदरच्या डंपर मध्ये ५०० पेक्षा जास्त चिरे भरले होते , त्यामुळे महसूल विभागाने रितसर पचनामा करून दंडात्मक कारवाई तसेच विनापरवाना डंपर वाहतूक करणारा चालकावर सिधुदुर्गनगरी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे.

सदरची घटना गावचे पोलीस पाटील स्वप्निल वेंगुलेकर यांना समजतात त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सिंधुदुर्गनगरी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांना याची कल्पना दिली. तसेच गावराई सरपंच सोनल शिरोडकर, कसाल मंडळ अधिकारी तेली. तलाठी सी. एम. कांबळी यांनाही याबाबतची कल्पना देण्यात आली. हेदूळ गावराई ते चंदगडच्या दिशेने चिरे वाहतूक करणारा हा डंपर क्रमांक एम एच ०७ एक्स १२६७मधून पाचशेपेक्षा अधिक चिरे भरलेले होते. अशी प्रत्यक्षदशी पाहणी पंचनाम्यात नोद झाली आहे. या मार्गावरुन अवैध चीरे वाहतूक होत असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चिरे वाहतूक करणारे अनेक डंपर गोवा ,कर्नाटक कोल्हापूर किंवा अन्य ठिकाणी जिरे वाहतूक करतात यापूर्वी तीन ते चार वेळा अशा प्रकारचे अपघात होण्याचे प्रकार घडले आहेत. त्यानुसार प्रशासनाने दखल घ्यावी . वस्तीतून भरधाव वेगाने चीरे वाहतूक करणारे डंपर बंद करावेत. अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे , गावराई धनगरवाडी सडा ते ग्रामपंचायत मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या या रस्त्यावरून वाहतूक होत असल्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून गेल्या तिन चार वर्षांपूर्वी कोटयावधी रुपये खर्च करून झालेला हा रस्ता या अवजड वाहतुकीमुळे वाहने चालविण्यास धोकादायक झाला आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. तसेच या अवजड वाहनामुळे धनगरवाडी खरी , देऊळवाडी व अन्य गावातील वस्त्यांमधून जाणारे येणारे अन्य वाहन चालक तसेच पादचारी यांना चालणे धोक्याचे झाले आहे. सदरची चिरे वाहतूक अवजड वाहतूक बंद करावी. धनगरवाडी सडा येथील असलेली वेडी वाकडी वळणे ही धोक्याची असून याबाबत रस्ते विकास प्राधिकरण यांनी येथून अवजड वाहतूक करण्यास निर्बंध घालावे याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदने दिली आहेत त्यानुसार सदरच्या रस्त्यावर वेडी वाकडी वळणे अवजड वाहतूक करण्यास धोकादायक असे फलकही लावण्यात आले आहेत ,परंतु दर दिवशी सतत मोठ्या प्रमाणात डंपरची होणारी ही वाहतूक ग्रामस्थांना जीवघेणी ठरू लागली आहे. या प्रश्नी येथील ग्रामस्थांनी रस्ते विकास प्राधिकरण प्रादेशिक , परिवहन विभाग वाहतूक शाखा , जिल्हाधिकारी , तहसीलदार तसेच ग्रामपंचायत यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी अर्ज सादर केले आहेत परंतु प्रशासन याकडे कधी लक्ष देणार ?असा सवाल येथील ग्रामस्थांनी केला आहे ,याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास आणि अवजड वाहतूक बंद न झाल्यास ग्रामस्थांना न्यायासाठी आंदोलन किंवा उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. आजच्या या घटनेचा तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस दूरक्षेत्र विभागाचे सहाय्यक पोलीस अधिकारी मनीष कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 8 =