You are currently viewing मुंबई डोंबिवलीच्या अक्षय मोगरकरने जिंकली प्रतिष्ठेची “भारत श्री” 2022…आणि मि.युनिव्हर्स 2022 चा ठरला उपविजेता

मुंबई डोंबिवलीच्या अक्षय मोगरकरने जिंकली प्रतिष्ठेची “भारत श्री” 2022…आणि मि.युनिव्हर्स 2022 चा ठरला उपविजेता

पुणे बालेवाडी येथे 15 ते 19 एप्रिल दरम्यान झाली शरीरसौष्ठव स्पर्धा

मुंबई डोंबिवली येथे राहणाऱ्या व मूळ देवगड, सिंधुदुर्ग येथील असलेल्या शरीरसौष्ठव पटू अक्षय मोगरकर याने अभिमानास्पद अशी कामगिरी केली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील अक्षय मोगरकरसाठी शरीरसौष्ठव स्पर्धा म्हणजे अत्यंत कठीण अशीच गोष्ट आहे. शरीरसौष्ठव सारख्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी खरतर प्रयत्नांबरोबरच आर्थिक परिस्थिती उत्तम असणे आवश्यक आहे. सर्व खडतर परिस्थितीवर मात करत अक्षय मोगरकर याने पुणे बालेवाडी येथे पार पडलेल्या “भारत श्री 2022” स्पर्धेत 90 kg गटात विजेतेपद पटकावले तर मि.युनिव्हर्स स्पर्धेत देखील अनेक देशांतील स्पर्धकांवर मात करत उपविजेतेपदावर आपले नाव कोरले. अटीतटीच्या झालेल्या स्पर्धेत एकापेक्षा एक मातब्बर शरीरसौष्ठव पटू सहभागी झाले होते. स्पर्धा एवढी चुरशीची झाली की कोणाच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडणार याची प्रतीक्षा लागून राहिली होती. परंतु जिगरबाज असलेल्या अक्षय मोगरकरच्या गळ्यात शेवटी “भारत श्री 2022” चे गोल्ड मेडल पडले. बालेवाडी येथेच पार पडलेल्या “मी युनिव्हर्स 2022” स्पर्धेत देखील अटीतटीच्या लढतीत प्रतिस्पर्धी मातब्बर खेळाडूंवर मात करत अक्षय मोगरकर हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरत सिल्व्हर मेडल प्राप्त केलं. त्याच्या या अतुलनीय कामगिरीमुळे सर्वच स्तरावरून त्याचे अभिनंदन होत आहे.


डोंबिवलीच्या अक्षय मोगरकर याने 6 एप्रिल 2022 रोजी झालेली “महाराष्ट्र श्री 2022” ही स्पर्धा देखील जिंकली होती. एकूण आठ वजनी गटांमध्ये ही स्पर्धा खेळली गेली होती. यातील 85+ किलोग्रॅम वरील वजनी गटामध्ये अक्षय मोगरकर याने भाग घेतला होता. चुरशीच्या झालेल्या स्पर्धेमध्ये अक्षय मोगरकर यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत 2022 चा टायटल विनर बनला होता. 2016 मध्ये देखील अक्षय मोगरकर याने “महाराष्ट्र श्री टायटल विनर” म्हणून स्पर्धा जिंकली होती.
अक्षय मोगरकर हा यापूर्वी 2016/17 सालात झालेल्या “मि.इंडिया” स्पर्धेचा विजेता ठरला होता. तर 2016/17 मधील “फेडरेशन कप”, “मिस्टर ठाणे” स्पर्धेतही विजेता होता. 2018 मध्ये झालेल्या “मिस्टर आशिया” स्पर्धेत त्याने सिल्वर मेडल प्राप्त केलं होतं. आजपर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये मिळालेल्या यशामुळे अक्षय मोगरकर याला पुणे येथे होणाऱ्या “मिस्टर युनिव्हर्स” आणि “मिस्टर इंडिया” या दोन्ही स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविण्याची पूर्ण खात्री होतीच. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये अनेक नामवंत आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू भाग घेत असतात. तरीही आपल्या देशासाठी सुवर्ण पदक जिंकण्यावरच अक्षय मोगरकर याने लक्ष केंद्रित केलेले होते. आपल्या भारत देशाला अभिमानास्पद अशी कामगिरी करण्याची अक्षय मोगरकर यांची प्रामाणिक इच्छा होती आणि भारत श्री 2022 प्रथम क्रमांक तसेच मि. युनिव्हर्स 2022 मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून अक्षयने विश्वास खरा ठरवला..
मुंबई डोंबिवली येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला अक्षय आणि त्याचे कुटुंब यांना अक्षयला स्पर्धेला तयार करण्यासाठी लागणारे डायट, न्यूट्रिशन, मल्टीविटामिन, मायक्रो न्यूट्रीयंटस इत्यादीसाठी येणारा खर्च हा पेलवणारा नाही. त्याच प्रमाणे प्रत्येक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी असणारी प्रवेश फी ही प्रत्येक शरीरसौष्ठवपटूनेच भरायची असते, आणि ती देखील प्रमाणापेक्षा जास्तच असते. त्यामुळे स्पर्धेसाठी उतरताना अक्षय मोगरकर याला प्रत्येक स्पर्धेला 80 ते 90 हजाराचा खर्च येतो. आपल्या देशासाठी आणखी अतुलनीय कामगिरी करण्याची आशा असणाऱ्या अक्षयला समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक हातभार लावून मदत करणे आवश्यक आहे. अक्षयचा आजपर्यंतचा स्पर्धांमधील प्रवास पाहिला असता, भविष्यात नक्कीच अक्षय मोगरकर भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करू शकतो. “मिस्टर युनिव्हर्स 2022” आणि “मिस्टर इंडिया 2022” या दोन्ही स्पर्धांमध्ये अविस्मरणीय कामगिरी करणाऱ्या अक्षयला आपण सर्वांनी शक्य ती आर्थिक मदत करून सहकार्य करावे,अशी अक्षय व त्याच्या कुटुंबीयांनी अशा व्यक्त केली आहे.

अक्षय मोगरकर याचे बँक डिटेल्स खालील प्रमाणे:-
अक्षय रवींद्र मोगरकर,
कॅनरा बँक, शाखा- डोंबिवली, मुंबई
खाते क्रमांक:- 1100 31 70 99 61
आय एफ एस सी कोड:- CNRB0000249

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =