कसई -दोडामार्ग नगरपंचायत निवडणूकित 4 जागा साठी 11 उमेदवारांत लढत

शेवटच्या दिवशी अर्ज मागे नाही

खरी लढत सेना-भाजपा मध्येच

दोडामार्ग

दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आज एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने ४ जागांसाठी अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.त्यामुळे चुरस वाढली आहे
आरक्षणाचा फटाका बसलेल्या उमेदवारांना आता संधी मिळाली असून काही ठिकाणी यापूर्वीच जाहीर उमेदवार यांना राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली आहे
सद्यस्थितीत या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मध्ये सुषमा लवू मिरकर -शिवसेना, प्रेरणा प्रताप नाईक -काँग्रेस, रुक्मिणी विठ्ठल शिरसाट -भाजपा, पंकजा विलास परमेकर- अपक्ष, संध्या राजेश प्रसादी- अपक्ष अशी पंचरंगी लढती होणार असून बंडखोरी झाली असल्याने ती कोणाच्या पथ्थावर पडते हे महत्वाचे ठरणार आहे
प्रभाग १ मध्ये सुरेश दादू तुळसकर-राष्ट्रवादी, रामचंद्र प्रभाकर मणेरीकर-भाजपा, यामध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस सेना महाविकास आघाडी अशी लढत एकास एक होणार आहे
प्रभाग ४ मध्ये वासंती अनिल मयेकर -शिवसेना, रेश्मा उद्देश कोरगावकर भाजपा अशी दुरंगी लढत होणार आहे.
प्रभाग क्रमांक 10 मध्ये माजी नगराध्यक्ष भाजपा उमेदवार संतोष नानचे विरुद्ध सेनेचे उमेदवार प्रशांत दत्ताराम नाईक याच्यात लढत होणार आहे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे या प्रभागात सेना व भाजपच्या वतीने जोरदारपणे फिल्डींग लावण्यात आली आहे या प्रभागाची निवडणूक नगरपंचायत निकालाची दिशा ठरविणारी ठरणार असल्याने सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =