You are currently viewing वागदे सरपंच पूजा घाडीगावकरसह शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश…

वागदे सरपंच पूजा घाडीगावकरसह शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश…

शाखाप्रमुख, ग्रामपंचयात सदस्यांचाही समावेश; नितेश राणेंकडून स्वागत…

कणकवली

तालुक्यात शिवसेनेला आणखी मोठा धक्का मिळाला आहे. वागदे सरपंच पूजा घाडीगांवकर, शिवसेना शाखाप्रमुख सुहास गावडे, ग्रा.पं सदस्य विजय सराफ यांच्यासह गावातील प्रमुख शिवसैनिकांनी आ. नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या वागदे ग्रामपंचयात सरपंच पूजा घाडीगांवकर यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे शिवसेनेला हा मोठा हादरा समजला जात आहे.
ओम गणेश निवासस्थानी हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, भाजपा तालुकाप्रमुख मिलिंद मेस्त्री, संदीप सावंत, संतोष गावडे, लक्ष्मण घाडीगांवकर, संदीप मेस्त्री, समीर प्रभूगावकर, सुभाष मालंडकर, शशी राणे, भाई काणेकर, महेश सरंगले आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा