You are currently viewing पारंपारिक व्यवसाय जगासमोर आणण्यासाठी रापण महोत्सवाचे आयोजन -संतोष लब्दे

पारंपारिक व्यवसाय जगासमोर आणण्यासाठी रापण महोत्सवाचे आयोजन -संतोष लब्दे

पारंपारिक व्यवसाय जगासमोर आणण्यासाठी रापण महोत्सवाचे आयोजन -संतोष लब्दे

देवगड

देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीने रापण महोत्सवाची संकल्पना आमच्यासमोर ठेवली तेव्हा वाढते पर्यटन व येथील पारंपारिक व्यवसाय याची सांगड घालत भविष्याचा विचार करून ही संकल्पना आम्ही आमच्या ग्रामस्थांसमोर मांडली त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्यामुळेच आज या ठिकाणी आपण महोत्सव संपन्न होत आहे. रापण व्यवसायाची आजची स्थिती पाहिली तर कालांतराने हा धंदा टिकेल की नाही अशी शाशकंता निर्माण झाल्यानेच येथील पारंपारिक व्यवसाय जगासमोर आणला पाहिजे व कुणकेश्वर पर्यटन वाढले पाहिजे यासाठी सर्व मच्छीमार रापण संघांनी यात हिरीहिरीने सहभाग घेतला.

आज मच्छिमारी बांधवांसाठी सरकारी योजना आहेत मात्र त्या योजना मिळवताना अनेक अडचणी येतात. पण पारंपारिक मच्छीमार मासे पकडण्यासाठी काय करतो हे शासनासमोर पोहोचणे देखील आज महत्त्वाचे आहे हे सर्व हेतू लक्षात घेऊन या महोत्सवात कुणकेश्वर कातवण ग्रामस्थ व महिला वर्गांनी बचत गटांनी सहभाग घेतला. पर्ससीन ट्रॉलरने होणाऱ्या मासेमारीचा रापण व्यवसायिकांना फार मोठा त्रास होत आहे असे असूनही प्राचीन पद्धतीने चालत आलेली पर्यावरण पूरक अशी नैसर्गिक पद्धतीने होणारी मच्छीमारी येथील रापण संघाने आजतागायत जपली जपली आहे असे प्रतिपादन श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे यांनी केले.

देवगड तालुका व्यापारी पर्यटन समिती, श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर, ग्रामपंचायत कुणकेश्वर, कातवण मधील रापण संघ व महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने कुणकेश्वर बीच येथे आयोजित केलेल्या रापण महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते . यावेळी व्यासपीठावर देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीचे प्रमोद नलावडे, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, दुर्गप्रेमी राजू परळेकर,कुणकेश्वर सरपंच शशिकांत लब्दे, माजी सरपंच गोविंद घाडी ,उद्योजक एकनाथ तेली, संदीप आचरेकर आदी उपस्थित होते .

महोत्सवाच्या माध्यमातून येथील संस्कृती जपण्याचे चांगलं काम देवगड तालुका व्यापारी पर्यटन समिती व कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर ग्रामपंचायत यांनी केल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद दिले.आपली संस्कृती, आठवणी जपण्यासाठी व अशा महोत्सवाचे आयोजन करताना येथे आलेल्या पर्यटक,शासकीय अधिकारी, सर्वसामान्य जनतेच्या आदरतीर्थ करणे खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर प्रसिद्धी माध्यमांनाही विश्वासात घेणे ही काळाची गरज आहे .कारण हिचं माध्यम आपले महोत्सव जगासमोर मांडतात. त्यामुळेचं महोत्सवाच्या पाऊलखुणा वर्षानुवर्षे त्या पर्यटक सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात ताज्या होतात. त्यामुळे इथे येणाऱ्या सर्वांचं आदरतीर्थ करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करताना त्यांनी विजयदुर्ग किल्ले येथे झालेल्या विजयदुर्ग किल्ला अष्टशताब्दी महोत्सवाचे उदाहरण दिले अष्टशताब्दी महोत्सव होऊन आज आठ ते दहा वर्षे पूर्ण झालीत. मात्र त्या महोत्सवाच्या पाऊलखुणा आजही पर्यटक व तेथील जनतेच्या मनात जिवंत असल्याचे मत यावेळी किल्ले प्रेरणोस्तव समितीचे माजी अध्यक्ष तथा दुर्गप्रेमी राजू परुळेकर यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा