You are currently viewing वेंगुर्ले ते गोवा बस फेऱ्या उद्या पासून सुरू…

वेंगुर्ले ते गोवा बस फेऱ्या उद्या पासून सुरू…

वेंगुर्ले

येथील आगारातून गोव्यात सुटणाऱ्या बसफेऱ्या २ ऑगस्ट पासून सुरू करण्याचा निर्णय आगार प्रमुखांनी घेतला आहे. त्यामुळे तालुक्यातून कामानिमित्त गोव्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान वेंगुर्ले भाजपच्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर त्यांच्या मागणीची एसटी महामंडळाने दखल घेत बस फेऱ्या सुरू केल्या आहेत.
गोवा राज्यात रोजगारासाठी वेंगुर्ले तालुक्यातील शेकडो युवक-युवती रोज ये-जा करतात. परंतु लाॅकडाऊनच्या काळात सीमेवरील निर्बंधांमुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत. सध्याच्या पावसाळी दिवसात त्यांना फार त्रास सहन करावा लागत होत. ही अडचण लक्षात घेऊन भाजपा वेंगुर्लेच्या वतीने सातत्याने गोवा येथे नोकरी निमित्त जाणाऱ्यांसाठी एस्.टी.ची वाहतुक सुरु करावी,अशी मागणी करण्यात आली होती.व एस्.टी.ची वाहतुक सुरु केली नाही तर प्रसंगी आंदोलन करु, असा इशारा एस्.टी.प्रशासनाला दिला होता. या मागणीची दखल घेत एस.टी.महामंडळाने २ ऑगस्टला सकाळी ६. ३० वाजता वेंगुर्ले आगारातून सातार्डा पर्यंत फेरीची घोषणा केली आहे. तसेच ती गाडी तिकडेच थांबवून संध्याकाळी ७ वाजता सातार्डा येथुन वेंगुर्ले येथे रवाना होणार आहे. नोकरी निमित्त व कामाधंद्यासाठी जाणाऱ्या वेंगुर्ले वासीयांनी या एस. टी.सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री देसाई यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा