You are currently viewing कुडाळात मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

कुडाळात मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

कुडाळ :

 

कुडाळ येथील ओंकार डीलक्स सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा संदीप दळवी तसेच मनसे कामगार सेना सरचिटणीस व पक्ष निरीक्षक गजानन राणे व मनसे राज्य उपाध्यक्ष प्रवीण मर्गज यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आयोजित करण्यात आला होता.

मनसे संघटना वाढली पाहिजे, तर गाव तेथे शाखा व पक्षाचा झेंडा गावागावात पोहोचला पाहिजे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसेच्या माध्यमातून नक्की प्रयत्न केले जातील तुम्ही हा मेळावा यशस्वी करून दाखविला त्याची परतफेड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी ग्वाही मनसेचे राज्य सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग जिल्हा पक्षनिरीक्षक संदीप दळवी यांनी कुडाळ येथे मनसे कार्यकर्ता मेळाव्यात रविवारी येथे दिली. ज्यांनी ज्यांनी हा मेळावा अयशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला त्यांना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. या मेळाव्याला जिल्ह्यातील पदाधिकारी – कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

यावेळी व्यासपीठावर राजू साटम, नंदू तळवडेकर, सुरेश शिंदे, श्रेया देसाई, मोनिका फर्नांडिस, धीरज परब, श्रिया ठाकूर , संतोष मयेकर , संतोष शिंगाडे, सहदेव उर्फ बाळा पावसकर , घनश्याम परब, फास्केल रोड्रिक्स , हेमंत जाधव ,अँड,अनिल केसरकर , चंदन दळवी, गणेश वाईरकर , कुणाल किनळेकर, सचिन गावडे व अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्याच्या उपस्थितीबाबत उपस्थित प्रमुख मान्यवरांनी गौरवोद्वार काढले. गाव तेथे शाखा स्थापन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन श्री दळवी यांनी करून येथील सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठीं मनसे पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी सतत कार्यरत राहिले पाहिजे. ज्या समस्या असतील त्या वरिष्ठ पातळीवरून सोडण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

श्री गजानन राणे यांनी या मेळाव्याला गर्दी आहे, याबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करून ही गर्दी पाहता भविष्यात मतदानात मतांमध्ये परिवर्तन करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे, असे सांगून कुडाळ, कणकवली व सावंतवाडी येथे लवकरच मनसेची कार्यालय सुरू करण्यात येतील असे सांगितले. इनस्टोर व ग्रामीण कोटा फायनान्स यांच्यामार्फत महिला बचत गटांची फसवणूकिकडे येथील काही महिलांनी लक्ष वेधले. त्यावर प्रत्येक तालुक्यातून फसवणूक झालेल्या खातेदारांनी तालुकावार एकत्र यावे. एकत्र येऊन फसवणूक करणाऱ्या संबधित कंपनीच्या प्रतिनिधींच्या घराकडे जाऊन बसूया. आम्ही पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी तुमच्या सोबत असणार आहोत, अशी ग्वाही श्री राणे यांनी दिली. श्री तळवडेकर, मोनिका फर्नांडिस, सुरेश शिंदे, संतोष मयेकर, धीरज परब, अनिल केसरकर, सचिन गावडे व अन्य काही पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बाळा पावसकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा