You are currently viewing बाप

बाप

बाप

बाप नावाचा माणूस…
बरेच खस्ते खातो.
तरीही कुटुंबासाठी,
हसत हसत जगतो.

सकाळ त्याची होते,
रात्रीचं ओझं वाहत.
रात्र त्याला जागवते,
उद्याची स्वप्न पाहत.

स्वप्नातही बाप बिचारा,
घराचंच सुख शोधतो.
आपुल्या लेकरांसाठी,
दिस-रात तो राबतो.

आपुल्या तान्हुल्याला,
बाप जीवापाड जपतो.
स्वप्न त्याची पूर्ण करण्या,
स्वप्न पाहणे विसरतो.

पायी चालताना स्वतः,
मुला खांदावर घेतो.
जे न पाहिले आपण,
ते ते सर्वच दाखवतो.

शब्द मुखी जरी तिखट,
डोळे मायेने भरलेले.
सुख बिलगता हृदयी,
अश्रू गालावर सांडलेले.

ठेच लागता बाळाला,
हृदय बापाचं रडतं.
धडपडत लेकरू ते,
कधी कधीच वाढतं.

आशा नसते बापाला,
पोरांनी त्यास सांभाळावे.
उंच भरारी घेताना फक्त,
एकदा… मागे वळून पहावे.
मागे वळून पहावे…!!

(दीपी)🖋️
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =