You are currently viewing बंदर विभागाच्या ‘धडक’ कारवाईत 24 तासाची नोटीस बजावत मालवण किनारपट्टीवरील बांधकाम जमीनदोस्त

बंदर विभागाच्या ‘धडक’ कारवाईत 24 तासाची नोटीस बजावत मालवण किनारपट्टीवरील बांधकाम जमीनदोस्त

बंदर विभागाच्या ‘धडक’ कारवाईत 24 तासाची नोटीस बजावत मालवण किनारपट्टीवरील बांधकाम जमीनदोस्त

पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी व्यक्त केल्या संतप्त भावना

सनदशीर मार्गाने न्यायालयीन लढा लढणार असल्याचे केले स्पष्ट

मालवण

गेली कित्येक वर्षे मालवण बंदर जेटी परिसरात बंदर विभागाच्या शासकीय जागेत असलेल्या पर्यटन व्यावसायिक दामोदर द्वारकानाथ तोडणकर यांचे राहते घर वजा मोरेश्वर स्कुबा डायविंग सेंटरच्या कार्यालयावर आज मालवण बंदर विभागाने जेसीबी द्वारे हातोडा फिरवीत हे बांधकाम जमीनदोस्त केले. २४ तासापूर्वी बंदर विभागाने दामोदर तोडणकर यांना अतिक्रमण केलेले बांधकाम हटविण्याबाबत नोटीस बजावली होती मात्र दिलेल्या मुदतीनंतर तोडणकर यांनी हे बांधकाम न हटविल्याने या बांधकामावर आज अखेर हातोडा फिरवला. बंदर विभागाने ही जोरदार कारवाई करताना पोलीस तसेच दंगल काबू पथक तैनात केले होते त्यामुळे बंदर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. या कारवाई दरम्यान बंदर विभागाने दांडी येथील दोन दगडी कठडेही तोडले.

या संबंधीचे अधिक वृत्त असे की, मालवण बंदर जेटी परिसरात गेली कित्येक वर्षे मालवणचे पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांचे राहते घर वजा मोरेश्वर स्कुबा डायव्हिंग सेंटरचे कार्यालय होते. मालवण बंदर विभागाच्या अगदी समोरच श्री. तोडणकर यांचे हे बांधकाम असल्याने २०२० साली मालवण बंदर विभागाने दामोदर तोडणकर यांना हे बांधकाम हटविण्याबाबत नोटीस बजावली होती तेव्हा पासून दामोदर तोडणकर आणि बंदर विभाग यांच्यात न्यायालयीन लढा सुरु होता असे बोलले जाते . बंदर विभागाने हे बांधकाम हटविण्याची कारवाई करीत असताना यावेळी वीज वितरण कंपनीचया कर्मचाऱ्यानी सदरच्या बांधकामाच्या ठिकाणी असलेले दोन्ही वीज मीटर हटविले.

बंदर विभागाने तोडणकर यांना दिलेल्या २४ तासांच्या नोटीसीमध्ये असे म्हटले आहे की, मालवण बंदर हद्दीमध्ये शासकीय जागेमध्ये वाहनतळामध्ये बांधकाम केलेले आहे. आपणास अतिक्रमण हटविणेबाबत कळविलेले होते. तरी सुद्धा आपण अतिक्रमण हटविलेले नाही. तरी समुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांनी अतिक्रमण काढून टाकणे बाबतची कारवाई करण्यासाठी कळविले आहे. सदरची जागा ही भारतीय बंदर अधिनियम १९०८ चे कलम ४ (३) अन्वये महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिपत्याखालील मालवण बंदर हद्दीत येते. सदरचे बांधकाम करण्यासंदर्भात आपण या कार्यालयाकडून कोणत्याही स्वरूपाची परवानगी नाहरकत दाखला घेतला नसल्याने निर्दशनास आले आहे. त्यामुळे आपण भारतीय बंदरे अधिनियम १९०८ चे कलम १० तसेच महाराष्ट्र सागरी मंडळ अधिनियम १९२६ च्या कलम ३५ चे उल्लंघन केले असल्यामुळे, सदरचे अतिव क्रमण उपरोक्त नियमांच्या अधीन राहून निष्कासित करणे आपणास बंधनकारक आहे. तरी भारतीय बंदरे अधिनियम १९०८ चे कलम १० महाराष्ट्र सागरी मंडळ अधिनियम १९९६ चे कलम ३५ आणि शासन गृह विभाग निर्णय क्र. पीडीई ०६०५/अधिकाराचे प्रत्यावर्तन/प्र. क्र. १७०/ बंदरे २, दिनांक २९ नोव्हेंबर २००५ मधील तरतुदीना अधीन राहून आपणास या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, आपण ही नोटीस प्राप्त झाल्यापासून २४ तासाच्या आत स्वखर्चाने हे अतिक्रमण विनाविलंब काढण्यात यावेत. अन्यथा कायद्याच्या तरतुदीस अधिन राहून आपल्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करून सदरचे अतिक्रमण हे अतिक्रमण हटाव योजनेने दूर केल्यास त्यापासून होणाऱ्या नुकसानीस आपण स्वतः जबाबदार असाल तसेच अतिक्रमण हटाव योजनेचा खर्च आपल्याकडून वसूल केला जाईल. महाराष्ट्र सागरी मंडळ, वेंगुर्ला बंदरे समूह, सिंधुदुर्ग ओरोस प्रादेशिक बंदर अधिकारी एस. व्ही. भूजबळ यांनी याबाबतची नोटीस दिली होती.

बुधवारी सकाळी बंदर विभागाचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात कारवाईसाठी दामोदर तोडणकर यांच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहचले, त्यांनी तोडणकर यांच्याशी चर्चा करून सर्व सामान बाहेर काढण्याचे निर्देश दिले. बांधकामाच्या आतमध्ये असलेले काही प्रमाणातील महत्वाचे साहित्य बाहेर काढल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी तोडणकर यांनी आपण हायकोर्टमध्ये प्रकरण दाखल केले आहे, त्याठिकाणी कोणताही बांधकाम तोडण्याबद्दल आदेश झालेला नाही, जिल्हा कोर्टातही सुनावणी सुरू आहे, यामुळे कारवाई करू नये अशी भुमीका घेतल्याचे समजते तर. बंदर अधिकारी एस. व्ही. भूजबळ यांनी बांधकाम तोडण्यात येवू नये अशाप्रकारचे आदेश दाखवा असे स्पष्ट करत कारवाई थांबणार नसल्याचे सांगितल्याची चर्चा आहे त्यानंतरच ही धडक कारवाई सुरू करण्यात आली.

आजच्या कारवाईसाठी बंदर विभागाचे बंदर अधिकारी एस. व्ही. भुजबळ, बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, सहाय्यक बंदर निरीक्षक अनंत गोसावी, अरविंद परदेशी, चौकीदार साहेबराव कदम, शंकर नार्वेकर हे अधिकारी सहभागी झाले होते. तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबु पथकासह मालवण पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी यावेळी बंदोबस्तासाठी तैनात होते. मालवण नगरपालिकेचेही अधिकारी व कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. तलाठी गौतम दळवी, पोलीस पाटील विठ्ठल बावकर तसेच इतरही उपस्थित होते.

दरम्यान, दामोदर तोडणकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना महसूल विभागाने ६८ जणांची अनधिकृत बांधकामे किनारपट्टीवर असल्याचे जाहीर करून त्यांनाही नोटीसा पाठविण्यात आलेल्या आहेत. यामुळे सदरची बांधकामेही हटविण्यात न आल्यास आपण बंदर विभागाच्या विरोधात समुद्रात बसून उपोषण करणार असल्याचे सांगितले

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =