You are currently viewing वेंगुर्लेतील मच्छी व भाजी विक्रेत्यांना राष्ट्रवादी व अर्चना घारे यांच्या माध्यमातून छत्र्यांचे वाटप…

वेंगुर्लेतील मच्छी व भाजी विक्रेत्यांना राष्ट्रवादी व अर्चना घारे यांच्या माध्यमातून छत्र्यांचे वाटप…

वेंगुर्लेतील मच्छी व भाजी विक्रेत्यांना राष्ट्रवादी व अर्चना घारे यांच्या माध्यमातून छत्र्यांचे वाटप

वेंगुर्ले

कष्टकरी महिलांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केला जाईल असे, आश्वासन कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे यांनी येथे दिले. राष्ट्रवादी व अर्चना घारे यांच्या माध्यमातून नुकतेच वेंगुर्ले येथील मच्छी व भाजी विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, वेंगुर्ले तालुका अध्यक्ष योगेश कुबल, माजी जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा परब, राष्ट्रवादी डॉक्टर सेल अध्यक्ष संजीव लिंगवत, जेष्ठ नेते नितीन कुबल, महीला तालुका अध्यक्ष दिपीका राणे, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, युवती अध्यक्ष अपुर्वा परब, सचिव स्वप्निल राऊळ, आबा टाक्कर, बावतीस डिसोजा, सुभाष तांडेल इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना वेंगुर्ला तालुका अध्यक्ष योगेश कुबल यांनी पवार साहेबांना अभिप्रेत असलेली राष्ट्रवादी कॉग्रेसची संघटणा वेंगुर्ला तालुक्यात उभी करुन सर्व सामान्य जनता, कष्टकरी, युवा वर्ग यांच्या पाठीशी पक्ष सदैव उभा राहील असे सांगितले.

दरम्यान यावेळी राष्ट्रवादी डॉक्टर सेल जिल्हा महिला संघटक पदी नियुक्ती बद्दल डॉ. सई लिंगवत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या तालुका अध्यक्ष पदी फैजान शेख, आडेली विभागीय अध्यक्ष वैभव वाडकर, बुथ प्रमुख उमेश आळवे, सचिन सावंत, अनिकेत वेंगुर्लेकर, वेंगुर्ले तालुका सदस्य बबन पडवळ व तालुका कार्य कारणीमध्ये विशाल बागायतकर यांचीही निवड करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा