You are currently viewing उपकेंद्रावर कोरोना चाचणी सुरू करा – राजन मुळीक 

उपकेंद्रावर कोरोना चाचणी सुरू करा – राजन मुळीक 

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील गर्दी टाळा

बांदा

ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण संख्या पाहता आरोग्य खात्याने यापुढे मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील उपकेंद्रावर कोरोना चाचणी सुरू करावीत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी गर्दी कमी होऊन लसीकरण व अन्य रुग्ण तपासणी सुरळीत होणार आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेला संसर्ग रोखण्यासाठी मळेवाड आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्या उपकेंद्रातच कोरोना चाचणी करावी अशी मागणी मळेवाड जि. प.सदस्य राजन ऊर्फ राजू मुळीक यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.

श्री. मुळीक म्हणाले, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना टेस्टिंग, तसेच लसीकरण किंवा अन्य रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. या प्राथमिक केंद्रात वीसच्या आसपास गाव जोडली गेली असून, येथील अनेक व्यक्ती कोणी लसीकरणासाठी, तर कोणी कोरोना टेस्टिंगसाठी येत आहेत. त्यामुळे गर्दी वाढत असून सोशल डिस्टन्सिंग राखणे अवघड बनत आहे. गावात व आजूबाजूच्या परिसरात सध्या रुग्णसंख्या वाढत असल्याने त्वरित उपकेंद्रातच कोरोना चाचणी सुरू करून प्राथमिक आरोग्य केंद्रावर पडणारा ताण कमी करावा. कोरोना अहवाल दोन दिवसांनी मिळत असल्याने योग्य उपचाराअभावी रुग्ण मृत्यू झाल्याचा तक्रारी येत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने याची दखल घेऊन तात्काळ मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व उपकेंद्रात कोरोना चाचणी सुरू करण्याची मागणी राजन मुळीक यांनी प्रशासनाकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =