कायद्याचे भांडवल नको, माणुसकी म्हणून रवी जाधवला न्याय मिळावा – अमित सामंत

कायद्याचे भांडवल नको, माणुसकी म्हणून रवी जाधवला न्याय मिळावा – अमित सामंत

उपोषण मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून मध्यस्थीचा प्रयत्न…

सावंतवाडी

येथील पालिका कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या रवी जाधव यांना न्याय मिळावा, यासाठी आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी प्रयत्न केला.सर्व गोष्टी कायद्यात विचार करून चालणार नाहीत. माणुसकी म्हणून काही निर्णय घेतले पाहीजेत, असे सांगून त्यांनी नगर विकास राज्यमंत्र्यांशी मोबाईलद्वारे चर्चा करून आंदोलकांची मागणी विचारात घ्या, आणि तशा सूचना जिल्हाधिका-यांना करा,अशी मागणी त्यांनी केली.
श्री.सामंत यांनी आज जाधव यांना उपोषणस्थळी जाऊन भेटली दिली, त्यांचे म्हणणे जाणून घेतले, आज उपोषणाचा सहावा दिवस आहे, जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण माघार घेणार नाही, असे जाधव म्हणाले. त्यानंतर श्री.सामंत यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. सर्वच गोष्टी कायद्याने होणार नाहीत. त्यामुळे काही माणुसकीचा विचार लक्षात घेऊन काही निर्णय घ्या, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. तशी मागणी मंत्र्यांकडे केली,अशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्यायला सांगितले. यावेळी राज्य सचिव संघटक काका कुडाळकर,सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शिवाजीराव घोगळे,सरफराज नाईक, हिदायतुल्ला खान, दर्शना बाबरदेसाई, कुतुबुद्दीन शेख, सुरेश वडार, अशोक पवार, नवल साटेलकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा