You are currently viewing जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत कासार्डेतील खेळाडुंचे वर्चस्व

जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत कासार्डेतील खेळाडुंचे वर्चस्व

ओरोस येथील जिल्हास्तरीय योगा स्पर्धेचा निकाल जाहीर

तळेरे- प्रतिनिधी

महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व बृहन महाराष्ट्र योग प्रसाद यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस येथील छ.शिवाजी महाराज कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा योगासने स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कासार्डे येथील योगा खेळाडूंनी सर्वच गटात वर्चस्व गाजवले आहे.
याप्रसंगी दै. तरुण भारतचे आवृत्तीप्रमुख शेखर सामंत यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तर प्राथ.शिक्षणाधिकारी श्री.धोत्रे, कृषी कॉलेजचे संचालक -सुशांत नाईक, योग समन्वयक सिंधुदुर्ग जिल्हा डॉ तुळशीराम
रावराणे आदीच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी कासार्डेच्या हर्ष घाडीगावक व वेंगुर्लेची कु.मारिया अल्मेडा यांनी सादर केलेल्या योगासनांच्या नयनरम्य प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून तरुण भारतचे आवृत्तीप्रमुख शेखर सामंत, शिक्षणाधिकारी
(प्राथमिक) श्री.धोत्रे ,कृषी कॉलेजचे संचालक सुशांत नाईक, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, एमवायएसएचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक डॉ. तुळशीराम रावराणे, शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे सिंधुदुर्गचे अध्यक्ष बयाजी बुराण,राज्य पंच संजय भोसले, क्रीडा शिक्षक-संदेश तुळसणकर, संजय पेंडुरकर, जयश्री कसालकर,स्पर्धा संयोजक कु.प्रियंका सुतार,कु. तेजल कुडतरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेला जिल्हाभरातून विविध योग केंद्राचे खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेच्या गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे-
*9 ते 14 वयोगट*
*ट्रॅडिशनल योगासने*
मुली –
कु.काव्या गोंडवळकर-प्रथम, कु.दूर्वा पाटील (कासार्डे हायस्कूल)-द्वितीय,कु.श्रेया डोईफोडे-तृतीय,कु.अश्मी राव -चतुर्थ, कु.शमिका चिपकर- पाचवी
*9 ते 14 वयोगट*
*ट्रॅडिशनल योगासने*
मुले –
.कल्पेश निकम(कासार्डे हायस्कूल)-प्रथम, कुणाल गोंडवळकर द्वितीय,हर्षल कनुरकर-तृतीय, वैभव वराडकर -चतुर्थ, दुर्गेश साटम- पाचवा.
*१४ते १८ वयोगट*
*ट्रॅडिशनल योगासने*
मुली –
कु. सानिका मत्तलवार-प्रथम,
रिया नकाशे-द्वितीय ( दोघी कासार्डे ज्यु.काॅलेज),
कु.निकिता लाड-तृतीय,
कु.नेहा पाताडे(कासार्डे ज्यु.काॅलेज)- चतुर्थ, कु.सिध्दी मोरजकर- पाचवी.
*१४ते १८ वयोगट*
*ट्रॅडिशनल योगासने*
मुले –
.गंधार नाईक-प्रथम, हर्ष घाडीगांवकर -द्वितीय, मयूर हडशी -तृतीय ( तिघेही कासार्डे ).

*१८वर्षावरील मुलींचा खुलागट*
*ट्रॅडिशनल योगासने*
मुली-मारिया अल्मेडा
(वेंगुर्ले)
-प्रथम,चैताली पेंडुरकर(कट्टा)
-द्वितीय, स्वाती गोडवे-तृतीय,मिनल राऊळ-चतुर्थ,
*१८वर्षावरील मुलांचा खुलागट*
*ट्रॅडिशनल योगासने*
मुले-
लक्ष्मण सदडेकर
(सावडाव)-प्रथम
*आर्टिस्टिक योगासने प्रकार-*
सिंगल मुली-
*९ते १४वयोगट मुली-*
कु.दुर्वा पाटील(कासार्डे हायस्कूल) -विजेती

*आर्टिस्टिक योगासने प्रकार-*
सिंगल मुलगे-
*९ते १४वयोगट मुलगे-*
कल्पेश निकम(कासार्डे हायस्कूल)- विजेता

*आर्टिस्टिक योगासने प्रकार-*
सिंगल मुली-
*१४ते १८वयोगट मुली-*
कु.नेहा पाताडे(कासार्डे ज्यु. काॅलेज) -विजेती

*आर्टिस्टिक योगासने प्रकार-*
सिंगल मुलगे-
*१४ते १८वयोगट मुलगे-*
गंधार नाईक- प्रथम,हर्ष घाडीगांवकर – व्दितीय,मयूर हडशी- तृतीय (सर्व कासार्डे ),

*आर्टिस्टिक योगासने प्रकार-*
सिंगल मुलगे-
*१८वर्षावरील खुला वयोगट मुली-*
मारिया अल्मेडा(वेंगुर्ले) – विजेता
*आर्टिस्टिक पेयर योगासने प्रकार*
१४ते १८वयोगट मुली
विजेती जोडी- कु. सानिका मत्तलवार व रिया नकाशे( कासार्डे ज्यु. काॅलेज)
या जिल्हास्तरीय योगा स्पर्धेला महाराष्ट्र असोसिएशनचे राज्य संजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंच
रविद्र पावसकर,सौ.निता सावंत,सौ.जे.डी.पाटील,
रावजी परब,संजय पेंडुरकर आदींनी उत्कृष्ट काम पाहिले, तर वेळाधिकारी आणि तांत्रिक सहाय्यक म्हणून सौ.श्वेता गावडे आणि विवेक राणे यांनी कामगिरी पार पाडली.
या स्पर्धेची जनरल चॅम्पियनशिप कासार्डे योगासन केंद्राने पटकाविली आहे.
हे सर्व यशस्वी खेळाडू राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरले असून ते राज्यस्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
वरील विजेत्या खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा योगासने स्पोर्ट असोसिएशनचे जिल्हा अध्यक्षा डॉ.वसुधा मोरे, समन्वयक डॉ.तुळशिराम रावराणे, उपाध्यक्ष शेखर बांदेकर, खजिनदार तथा जिल्हा उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्यासह अन्य सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी खेळाडुंचे अभिनंदन करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


१)ओरोस येथील जिल्हास्तरीय योगा स्पर्धेतील एक क्षण…

 

२.ओरोस येथील जिल्हास्तरीय योगास्पर्धेतील यशस्वी खेळाडूसोबत मान्यवर
छाया:-

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 17 =