You are currently viewing मसुरेत कठडा नसलेल्या विहिरीत पडल्यामुळे १४ रानडुक्करांचा पाण्यात बुडून मृत्यू…

मसुरेत कठडा नसलेल्या विहिरीत पडल्यामुळे १४ रानडुक्करांचा पाण्यात बुडून मृत्यू…

मसुरेत कठडा नसलेल्या विहिरीत कोसळल्यामुळे १४ रानडुक्करांचा पाण्यात बुडून मृत्यू

मालवण

मार्गाचीतड येथे कठडा नसलेल्या विहिरीत पडल्याने १४ रानडुक्करांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, मालवण वनपाल श्रीकृष्ण परीट यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृत डुक्करांचे वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्याने त्याच विहिरीत दफन केले.

यावेळी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी अनंत शिरसाट, पशुधन पर्यवेक्षक निलेश पवार उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील सुषमा परब आणि कुटुंबियांच्या मालकीच्या जमिनीत कठडा नसलेली वापर नसलेली विहीर आहे. सुमारे आठ दिवसांपूर्वी या विहिरी नजीक काही तरी पडल्याचा आवाज आला होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने या विहिरीतून दुर्गंधी येऊ लागल्या नंतर विहिरीत डोकावून पहिल्या नंतर सर्व रानडुक्करे मृत झालेली दिसून आली. याबाबत अशोक सांडव यांनी वनविभागाला कळविले. वनविभागाचे वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी वैधकीय अधिकारी यांच्यासह पाहणी करून सर्व डुकर मृत झाल्याने जमीन मालकांच्या परवानगीने या विहिरीत वडाचापाट येथील उद्योजक दया देसाई यांच्या जेसीबी च्या सहाय्याने माती टाकून सर्व डुकरांचे दफन केले.

यावेळी वनरक्षक शरद कांबळे, संजीव जाधव, अनिल परब, पोलीस पाटील नेवेश फर्नांडिस, दया देसाई,सत्यविजय भोगले, रोहन पाताडे, दिलीप परब, यधनेश गुरव, अमित बागवे, भूषण मसुरेकर, साईप्रसाद बागवे, सचिन गोलतकर, केतन कांबळी आदींनी सहकार्य केले.

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा