You are currently viewing सदस्य नोंदणीत कुडाळ मालवण पॅटर्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक नंबरला राहील – संग्राम प्रभुगावकर

सदस्य नोंदणीत कुडाळ मालवण पॅटर्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक नंबरला राहील – संग्राम प्रभुगावकर

माणगाव,घावनळे,पावशी, पिंगुळी जि.प. मतदारसंघात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

आ.वैभव नाईक, संजय पडते, संग्राम प्रभुगावकर यांनी केले मार्गदर्शन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते १५ डिसेंबर या कालावधीत शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे.यांचा शुभारंभ मागणाव येथून झाल्यानंतर घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघात गोठोस येथे कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर पावशी व पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम घेण्यात आला. प्रत्येक शिवसैनिकाने पुढाकार घेऊन जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी. सदस्य नोंदणीत कुडाळ मालवण पॅटर्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक नंबरला राहील. कुडाळ मालवण पॅटर्नची संपूर्ण महाराष्ट्राने दखल घ्यावी अशा पद्धतीने काम करा. येणाऱ्या निवडणुका आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणूका आहेत. या निवणुकांमध्ये शिवसेनेला विजय संपादन करण्यासाठी सदस्य नोंदणीवर भर द्या. असे आवाहन यावेळी कुडाळ तालुका निरीक्षक संग्राम प्रभुगावकर आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमसेन सावंत, जि.प.सदस्य राजू कविटकर, तालुका प्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे, उपसभापती जयभारत पालव, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, उपतालुका प्रमुख बाळू पालव , माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, अतुल बंगे, पंचायत समिती सदस्य सौ.श्रेया परब,सौ.मथुरा राऊळ, तालुका महिला संघटक स्नेहा दळवी, युवासेना तालुकाप्रमुख राजू जांभेकर, योगेश धुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी घावनळे जि.प मतदारसंघाचा गोठोस येथे सदस्य नोंदणी कार्यक्रम पार पडला यावेळी विभागप्रमुख रामभाऊ धुरी, उपविभाग प्रमुख प्रशांत म्हाडगुत,सागर म्हाडगुत,उत्तम म्हाडगुत,सुधीर राऊळ,सुरेश मेस्त्री, भाऊ सावंत,विष्णू ताम्हणेकर,दाजी पडकील आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.
पावशी येथे विभागप्रमुख दीपक आंगणे, सरपंच बाळा कोरगावकर, तानाजी पालव, प्रसाद शेलटे, सागर भोगटे, संजय परब, सुरेश पेडणेकर, सीमा खोत, रामू कोचरेकर,मंदार कोळावळे, रुपेश शिरोडकर, आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंगुळी येथे विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, पं. स. सदस्य मिलिंद नाईक, नीलिमा वालावलकर ,पिंगुळी सरपंच निर्मला पालकर, मांडकुली सरपंच तुषार सामंत, उपसरपंच दिलीप नीचम, बबलू पिंगुळकर, सिद्धेश धुरी, विनिता पिंगुळकर, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 5 =