हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सावंतवाडी शिवसेनेच्या वतीने जयंती साजरी

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सावंतवाडी शिवसेनेच्या वतीने जयंती साजरी

सावंतवाडी

येथील माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सावंतवाडी शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, “शिवसेना जिंदाबाद”, “शिवाजी महाराज की जय” अशा प्रकारे नारे देऊन संपूर्ण वातावरण दणाणून गेले होते.
यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, अशोक दळवी, शब्बीर मणियार, सुरेंद्र बांदेकर, सुरेश भोगटे, भारती मोरे, शुभांगी सुकी, रश्मी माळोदे, दिपाली सावंत, अमिषा शेख, लक्ष्मी मेस्त्री, नीता कविटकर, प्रगती बामणे, गजानन नाटेकर, सुरेश सावंत आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा