You are currently viewing आज १३ एप्रिल ला बापर्डे व पोंभुर्ले जि. प. मतदार संघात लाभार्थी महिला मेळावा

आज १३ एप्रिल ला बापर्डे व पोंभुर्ले जि. प. मतदार संघात लाभार्थी महिला मेळावा

प्रमुख मार्गदर्शक सौ. निलमताई राणे यांची उपस्थिती

 

देवगड :

 

आज १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सप्तपदी मंगल कार्यालय पाटगाव येथे बापर्डे व पोंभुर्ले जि. प. मतदार संघ लाभार्थी महिला मेळावा आयोजित करण्यात आला असून यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ निलमताई नारायणराव राणे उपस्थित राहणार आहेत.

मोदी सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या या लाभार्थींचा हा मेळावा असून या मेळाव्याला या दोन्ही मतदारसंघातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष संजना आळवे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा