राष्ट्रीय लोकअदालत १० एप्रिल रोजी…

राष्ट्रीय लोकअदालत १० एप्रिल रोजी…

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात आयोजन नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आवाहन

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 10 एप्रिल 2021 रोजी तडजोड पात्र प्रलंबित खटले मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालीचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षानुवर्ष वेगवेगळ्या कारणांमुळे प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण व वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीचा संबंधित नागरीकांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन सचिव, मे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग ओरोस यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा