You are currently viewing ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कडून गांव मर्यादित पर्यावरण पूरक गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कडून गांव मर्यादित पर्यावरण पूरक गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी

गणेश चतुर्थी निमित्त ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कडून गांव मर्यादित पर्यावरण पूरक गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री गणेश चतुर्थी निमित्त आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी ग्रामपंचायत कार्यालयात करावी.सदर स्पर्धेचे परीक्षण हे गणपतीचा पाचव्या दिवसानंतर केले जाणार आहे.मात्र दीड दिवस व पाच दिवस ज्यांचे गणपती असणार आहेत अशी व्यक्तीं स्पर्धेत सहभागी होणार असेल तर त्या व्यक्तीने तशी पूर्वकल्पना ग्रामपंचायत कार्यालयात नाव नोंदणी करत असताना देणे जेणेकरून सदर व्यक्तीच्या गणेश सजावट चे परीक्षण गणपती विसर्जन पूर्वी करता येईल.तरी इच्छुक स्पर्धकांनी 29 ऑगस्ट 2022 पूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात नाव नोंदणी करावी ही विनंती.प्लॅस्टर ऑफ पॅरिस ची गणेश मूर्ती असणाऱ्या व्यक्तीला स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही याची नोंद घ्यावी.वेळीच मुदतीत नाव नोंदणी करावी असे आवाहन सरपंच मिलन पार्सेकर व उपसरपंच हेमंत मराठे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + two =