You are currently viewing तब्बल नऊ गॅस टाक्यांचा स्फोट, नागरिकांची पळापळ, 3 स्कूल बस जळाल्या

तब्बल नऊ गॅस टाक्यांचा स्फोट, नागरिकांची पळापळ, 3 स्कूल बस जळाल्या

तब्बल नऊ गॅस टाक्यांचा स्फोट, नागरिकांची पळापळ, 3 स्कूल बस जळाल्या

पिंपरी चिंचवडमध्ये  रविवारी नऊ गॅस टाक्यांचा स्फोट  झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमागे एक धक्कादायक कारण समोर आलेलं असून ही आग गॅस चोरीचा काळाबजार करत असताना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

तब्बल नऊ टाक्यांचा स्फोट
पिंपरी चिंचवडमधील ताथवडे शहरात एका टँकरमधून गॅस चोरी करताना तब्बल नऊ टाक्यांचा स्फोट झाला. एकामागोमाग एक स्फोट झाल्यानं ताथवडे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. आगीचे रौद्ररूप पाहून गॅस चोरीचा काळाबाजार करणाऱ्यांनी इथून पळ काढला. ज्या ठिकाणी आग लागली, त्याच्या बाजूलाच शाळा, हॉस्टेल आणि रहिवाशीही राहत होते. दरम्यान यात सुदैवाची गोष्ट म्हणजे या आगीच्या कचाट्यात कोणीच सापडले नाही, मात्र शाळेतील तीन वाहनं यात जळून खाक झाली आहेत.

एक तासानंतर आग आटोक्यात
रविवारी रात्री पावणे अकरा वाजता लागलेली आग पावणे बाराच्या सुमारास नियंत्रणात आली. गॅसच्या टाक्यावरील कुलिंग ऑपरेशनसाठी पुढचा तासभर तरी लागला. दुसरीकडे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून टँकर चालकांसह गॅस चोरट्यांचा शोधही सुरू आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

माहितीनुसार, गॅसच्या टाकीला आग लागल्याने मोठे स्फोट झाले, ज्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे या भागात काही काळ गर्दी देखील झाल्याचे पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी घटना घडली त्याच्या बाजूच्या सोसायटीत नागरिकांची पळापळ झाली. दरम्यान, या स्फोटामुळे इथले नागरिक घाबरलेले आहेत. तसेच रस्त्यावर मोठी गर्दी देखील झाल्याचे पाहायला मिळाले.

सुदैवाने जीवितहानी नाही
गॅस टाकीचा एकामागोमाग स्फोटाचा आवाज झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजलेले नसून सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा