You are currently viewing आताच्या राजकारणामधील संवेदनशीलता संपली.-प्रमोद जठार

आताच्या राजकारणामधील संवेदनशीलता संपली.-प्रमोद जठार

साहित्यिक , पत्रकार , चित्रकार, यांच्यामध्ये एक गुण प्रामुख्याने दिसतो तो म्हणजे संवेदनशीलता.

त्यांच्याकडे संवेदनशीलता जिवंत आहे म्हणूनच आज नवीन काहीतरी निर्मिती होते ती हल्लीच्या राजकारण्यांमध्ये दिसत नसल्याचे प्रतिपादन सिंधूभुमी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त पोभूर्ले येथील दर्पण सभागृहात आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात दरम्यान केले. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती प्रत्येक शासकीय कार्यालयात साजरी व्हावी असा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतल्याबद्दल राज्य सरकारच्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत देखील केले .देवगडच्या सूनबाई यांनी रेखाटन केलेल्या व प्रशासनाने अधिकृत केलेली बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राची प्रतिमा त्यांनी पोभूर्ले येथील दर्पण सभागृहास भेट दिली .

देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून देवगड तालुका पत्रकार समिती व जांभेकर कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुका पत्रकार समिती पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम पोंभुर्ले येथील दर्पण सभागृहात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे,ज्येष्ठ पत्रकार माधव कदम सिंधुभूमी फाउंडेशन अध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार पत्रकार राजेश मोंडकर व सुधाकर जांभेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले .

यावेळी देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार शहरी विभाग स्वप्नील लोके यांना सिंधूभूमी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद जठारप्रमोद जठार यांच्या हस्ते देत सन्मानित करण्यात आले सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुका पत्रकार समितीच्या पत्रकारांच्या पाल्यांच्या गुणवंत मुलांचे भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले तसेच इतर पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे देखील समितीच्या वतीने सत्कार करण्यात आले.

देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नामफलकाचे अनावरन

ज्येष्ठ पत्रकार विनायक मिठबावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व नामफलकाला तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रशांत वाडेकर व ज्येष्ठ पत्रकार संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार घालत सर्व पत्रकाराच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर व जांभेकर कुटुंबीय यांचा शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार विनायक मिठबावकर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सचिव उमेश तोरसकर सुधाकर जांभेकर, बाजीराव जांभेकर, देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रशांत वाडेकर ,उपाध्यक्ष दयानंद मांगले, सचिव स्वप्नील लोके , खजिनदार दिनेश साटम, तळेबाजार पत्रकार समितीचे अध्यक्ष संजय खानविलकर , देवगड तालुका पत्रकार समितीचे सर्व पत्रकार व तळेरे पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.वरण.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा