You are currently viewing पाच व्या टप्यातील महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांचे आज 48 तास काम बंद आंदोलन कुडाळात सुरू…

पाच व्या टप्यातील महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांचे आज 48 तास काम बंद आंदोलन कुडाळात सुरू…

पाच व्या टप्यातील महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांचे आज 48 तास काम बंद आंदोलन कुडाळात सुरू…

श्री. अमर लोहार तसेच अमोल भास्कर यांचे कामगारांना मार्गदर्शन

सिंधुदुर्ग

आपल्या विविध १७ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कामगार संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयाच्या बाहेर आज पाच व्या टप्यातील 48 तास काम बंद आंदोलन सुरू आहे. कुडाळ सर्कल ऑफिस जवळ 200-300 कंत्राटी कमगार उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ चे केंद्रीय कार्याध्यक्ष श्री. अमर लोहार साहेब तसेच अमोल भास्कर यांनी कामगारांना मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व कामगारानी घोषणा देऊन सरकार व प्रशासनाचा निषेध केला.

‘असे कसे देत नाही? घेतल्याशिवाय जात नाही,’ अशी घोषणाबाजी आंदोलकांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी चंग बांधला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या, तसेच महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या ३ वीज कंपन्यांतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ, रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार आदी मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे

या तीनही कंपनीतील कंत्राटी कामगार हे अनुभवी व कुशल आहेत. १५ ते २० वर्षांपासून ते काम करत आहेत. या कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या अनेक संघटनांनी शासन दरबारी मांडल्या. मात्र या कामगारांना अद्याप न्याय मिळाला नाही. यासाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती २०२४ ची स्थापना करण्यात आली. या समितीने आपल्या १७ मागण्या शासनापुढे ठेवल्या आहेत.

तीनही कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांना मिळत असलेल्या एकूण पगारात बेसिक पूरक भत्ता १ एप्रिल २०२३ पासून ३० टक्के वेतनवाढ मिळावी, मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी, तीनही वीज कंपनीतील मंजूर नियमित रिक्त पदांवर व गरजेनुसार काम करत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्यावे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान कामात समान वेतन मिळावे, कंत्राटी कामगाराच्या अपघाती मृत्यूनंतर वारसांना दिली जाणारी आर्थिक मदत वाढवून १५ लाख रुपये मिळावी, अशा अनेक मागण्या कंत्राटी कामगारांनी केल्या आहेत.

बुधवारी सकाळपासून कंत्राटी कामगार धरणे आंदोलनाला बसले होते. यावेळी आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांनी शासनाचे लक्ष वेधून घेत आम्हाला न्याय द्या, अशी मागणी लावून धरली. यावेळी कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकार व प्रशासनाचा निषेध केला.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 13 =