You are currently viewing सिंधुदुर्गातील 24 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका

सिंधुदुर्गातील 24 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका

5 नोव्हेंबर रोजी होणार मतदान

 

सिंधुदुर्ग :

 

मुदत संपणाऱ्या व चुकीच्या प्रभाग रचनेमुळे निवडणुकांना झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम शासनाने जाहीर केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 24 ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या असून या ग्रामपंचायतीचा या निवडणुका कार्यक्रमात समावेश आहे. तर याच वेळी सिंधुदुर्गातील 52 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे त्या त्या ग्रामपंचायत क्षेत्रात व त्या त्या प्रभागात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. ग्रामपंचायत च्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे आता रखडलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती आधी स्वायत्त संस्थांचा निवडणुक कार्यक्रम टप्प्याटप्प्याने जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, तसेच नव्याने स्थापित व सन 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या सदस्य पदास व थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणाली द्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 24 सार्वत्रिक व 52 पोटनिवडणूक जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे त्या 24 ग्रामपंचायत क्षेत्र मर्यादित आचारसंहिता जाहीर झाली आहे.

सर्वत्रिक निवडणूक होत असलेल्या 24 ग्रामपंचायती असून देवगड तालुक्यातील वलीवंडे, शिरवली, रामेश्वर, पावनाई, फणसगाव, विठ्ठलादेवी, तिर्लोट व ठाकूरवाडी. वेंगुर्ला मधील पेंडूर, मातोंड खानोली व वायंगणी. कुडाळ मधील हूमरमळा (अणाव), हुमरमळा (वालावल), वालावल, भडगाव व वर्दे. मालवण मधील आचरा. दोडामार्ग मधील साटेली भेडशी, बोडण, कुडासे, खुर्द दोडामार्ग. कणकवली मधील ओटव आणि बेळणेखुर्द या 26 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.

24 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक 52 ग्रामपंचायत मधील 56 सदस्यांच्या पोटनिवडणुका पोटनिवडणुकांमधील पाच सरपंचांच्या निवडणुकीचा कार्यक्रम या जिल्ह्यात होणार आहे. तहसीलदारनी नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक 6 नोव्हेंबर, उमेदवारांचे कडून नामनिर्देशन मागविणे व सादर करण्याची मुदत 16 ते 20 ऑक्टोबर, नामनिर्देशन पत्राची छाननी 23 ऑक्टोबर उमेदवारांनी नाम निर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत 25 ऑक्टोबर, चिन्ह देण्याचा दिनांक 25 ऑक्टोबर, मतदानाची तारीख 5 नोव्हेंबर सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 मतमोजणी व निकाल 6 नोव्हेंबर असा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा