You are currently viewing भाजप युवा मोर्चा बांदा,वेंगुर्ले व आंबोली मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या रद्द…

भाजप युवा मोर्चा बांदा,वेंगुर्ले व आंबोली मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या रद्द…

भाजप युवा मोर्चा बांदा,वेंगुर्ले व आंबोली मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या रद्द…

राहूल लोणीकर यांचा जिल्हाध्यक्षांना आदेश ; कोण होणार नवीन मंडल अध्यक्ष..? सर्वाचे लक्ष..

सावंतवाडी

भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील नुकत्याच नव्याने नियुक्ती करण्यात आलेल्या युवा मोर्चाच्या बांदा आंबोली व वेंगुर्ले मंडल अध्यक्षांच्या निवडीला भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे आता सर्वांचे लक्ष.

दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बांदा मंडल अध्यक्षपदी सिद्धेश कांबळी, आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, वेंगुर्ले मंडल अध्यक्ष प्रणव वेंगुर्लेकर यांची अलीकडेच नव्याने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र प्रदेशाध्यक्ष श्री लोणीकर यांनी भाजयुवो जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांना या संदर्भात पत्र काढत सदरच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याने म्हटले आहे. त्यांनी पत्रात माजी आमदार राजन तेली यांच्या संमतीने पुढील निर्णय घ्यावा असेही म्हटले आहे. त्यामुळे रद्द करण्यात आलेल्या नियुक्तीच्या ठिकाणी नव्याने कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा