You are currently viewing कुडाळ तालुक्यात सरपंच पदासाठी ५ तर सदस्य पदासाठी ११ अर्ज दाखल

कुडाळ तालुक्यात सरपंच पदासाठी ५ तर सदस्य पदासाठी ११ अर्ज दाखल

कुडाळ

कुडाळ तालुक्यातील होणाऱ्या ५४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरपंच पदासाठी ५ तर सदस्य पदासाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

कुडाळ तालुक्यामध्ये ५४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी सरपंच पदासाठी ५ तर सदस्य पदासाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. यामध्ये सरपंच पदासाठी निवजे, रानबांबूळी, चेंदवण, निरुखे, घोटगे तर सदस्य पदासाठी तुळसुली तर्फ माणगाव, केरवडे तर्फ माणगाव, साळगाव, पिंगुळी, निवजे (२ अर्ज), सरंबळ, निरुखे (२ अर्ज), आंबडपाल (२ अर्ज) या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा