You are currently viewing बंटी माठेकर मित्र मंडळाकडून वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नरेंद्र डोंगर पायथ्याशी  

बंटी माठेकर मित्र मंडळाकडून वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नरेंद्र डोंगर पायथ्याशी  

बंटी माठेकर मित्र मंडळाकडून वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नरेंद्र डोंगर पायथ्याशी

सावंतवाडी

सावंतवाडी वन विभागाने उष्णतेच्या तीव्र लाटा सुरू होवूनही वन्य प्राण्यांना पाण्याची सोय केली नसल्याने बंटी माठेकर मित्र मंडळाकडून वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नरेंद्र डोंगर पायथ्याशी केली आहे.

उन्हाळा सुरू झाला आहे वन्य प्राणी पाण्याच्या शोधामध्ये भर वस्तीमध्ये येत असल्याने लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. याकरिता बंटी माठेकर मित्र मंडळाच्या माध्यमातून वन विभागाला वारंवार कल्पना देऊन देखील वन विभागाने याची अध्यापही दखल घेतली नाही. अखेर शेवटी वन्य प्राण्यांना पाणी मिळावं याकरिता मदारी रोड सासोलकर मैदान शेजारी या मित्र मंडळाने कृत्रिम पाण्याची तळी तयार केली आहे.

याकरिता अमित सावंत, संजय नाईक, सचिन सासोलकर, बाळा सोनकर, बंटी माठेकर, प्रसाद जोशी व पाटकर यांनी यासाठी पुढाकार घेऊन वन्य प्राण्यांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था केली आहे. अशाच प्रकारे वन विभागामार्फत देखील ठिकठिकाणी कृत्रिम पाण्याची तळी तयार करून वन्य प्राण्यांसाठी पाणी पाण्याची व्यवस्था करावी त्याचप्रमाणे भर वस्तीमध्ये वन्य प्राणी येऊ नये याकरिता देखील वन विभागाकडून लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा अशी मागणी बंटी माठेकर मित्र मंडळाने केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 14 =