You are currently viewing पोलीस भरतीतंर्गत चालक व पोलीस अंमलदार पदासाठी मैदानी चाचणी ११ जानेवारी पर्यंत – पोलीस निरीक्षक संदीप भोसले

पोलीस भरतीतंर्गत चालक व पोलीस अंमलदार पदासाठी मैदानी चाचणी ११ जानेवारी पर्यंत – पोलीस निरीक्षक संदीप भोसले

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा पोलीस दलातंर्गत सोमवार दिनांक २ ते ४ जानेवारी २०२३ कालावधीत चालक पोलीस अंमलदार पदांची मैदानी चाचणी आणि गुरुवार दिनांक ५ ते ११ जानेवारी २०२३ कालावधीत पोलीस अंमलदार पदाची मैदानी चाचणी, पोलीस मुख्यालय मैदानावर होणार,असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग दलातंर्गत मैदानी चाचणीसाठी एकुण ८ हजार ८४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी चालक पदासाठी २ हजार १२६ अर्ज असून पोलीस अंमलदार पदासाठी ५ हजार ९५८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेत पोलीस अंमलदार ९९ पदे आणि चालक पोलीस अंमलदार २२ पदे अशी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांनी सिंधुदुर्ग पोलीस दल येथे भरती प्रक्रीयेसाठी ऑनलाईन आवेदन अर्ज भरलेले आहेत त्यांनी महाआयटी कडून प्रवेशपत्र पाठविण्यात आलेले आहेत. संबंधित उमेदवारांनी ओळखपत्राच्या दोन प्रती आवेदन अर्जाच्या आणि त्यांच्या छायांकित प्रतीचा संच तसेच आवेदन अर्जावर सादर केलेल्या छायाचित्राच्या पासपोर्ट साईजच्या छायाचित्रासह त्यांना बोलविलेल्या दिवशी व वेळेत पोलीस मुख्यालय सिंधुदुर्ग मैदानावर हजर राहणेबाबत आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 5 =