You are currently viewing कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी न राहता बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांच्या पाठीशी पालकमंत्री व आमदार

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी न राहता बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांच्या पाठीशी पालकमंत्री व आमदार

मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांची घणाघाती टीका

मालवण
एकीकडे बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करत रॅम्प उध्वस्त करणाऱ्या कर्तव्यदक्ष तहसीलदारांना दमदाटी करणाऱ्या विरोधात तक्रार करूनही जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार हे कोणतीही दखल घेत नाहीत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी न राहता वाळू व्यावसायिक, भ्रष्टाचार करणारे ठेकेदार, सरकारी कामात व्यत्यय आणणाऱ्या व्यक्ती तसेच बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या दोन नंबर वाल्यांना पाठीशी घालण्याचे काम पालकमंत्री व आमदार करीत असल्याची घणाघाती टीका मनसे राज्य सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली. मनसे नेते परशुराम उपरकर यांनी मालवण रेवतळे येथे विल्सन गिरकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, शैलेश अंधारी, तालुका सचिव विल्सन गिरकर, सौ. भारती वाघ, उदय गावडे, अमित राजापूरकर, विशाल ओटवणेकर, प्रणव उपरकर, नागेश चव्हाण, विजय पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी उपरकर म्हणाले, शिवसेना व आम. वैभव नाईक यांनी मतांच्या गणितासाठी आश्वासने दाखवून मच्छीमारांची वेळोवेळी केवळ फसवणूक केली आहे. कोकण किनारपट्टीवरील वादळात नुकसानग्रस्त झालेल्या मच्छीमारां साठी सरकारने ६५ कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. यातील १२ कोटी निधी मालवण मधील मच्छीमारांना मिळणार असे आम. वैभव नाईक यांनी सांगितले होते. मात्र संपूर्ण जिल्ह्यासाठीच अडीज कोटींचा निधी प्राप्त झाला. मग यातील किती निधी मालवणच्या मच्छीमारांना मिळणार ? १२ कोटीतील १० कोटी गेले कुठे ? असे सवाल उपरकर यांनी उपस्थित करून मात्र प्रत्यक्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीच अडीज कोटींचा निधी प्राप्त झाला असल्याने आम. नाईक यांची फसवेफिरी उघड झाली आहे. मच्छीमारांना नेहमीच फसविणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा मतांसाठी मच्छीमारांची दिशाभूल केली आहे, अशी टीका त्यांनी केली यावेळी बोलताना उपरकर यांनी एलईडी लाईट मासेमारीवरील कारवाई कडक करू असे आश्वासनही आम. नाईक यांनी दिले होते. मात्र त्याबाबतही कोणती कार्यवाही झालेली नाही. आज समुद्रात राजरोसपणे एलईडी लाईट मासेमारी सुरू आहे. केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेणे व नंतर फसविणे हेच काम आमदारांसह शिवसेनेचे चालू आहे, अशी टीकाही उपरकर यांनी केली. ज्या कुडाळ प्रांतांधिकाऱ्यांवर आम. वैभव नाईक यांनी आरोप प्रत्यारोप केले त्या प्रांताधिकाऱ्यांची चौकशी समितीने क्लिन चिट दिली. एका आमदाराने तक्रार करूनही क्लिन चिट मिळाली. याप्रकरणी पालकमंत्र्यांनी पुन्हा चौकशीचे आदेश देत आपण किती तत्पर आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे असेही उपरकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + ten =