You are currently viewing यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडे कोणी वर डोळे करून पाहण्याची हिम्मत करून दाखवावी

यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडे कोणी वर डोळे करून पाहण्याची हिम्मत करून दाखवावी

राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला इशारा

 

सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांची घेतली भेट

 

सावंतवाडी :

 

सिंधुदुर्ग – राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर नशेच्या आहारी गेलेल्या काही लोकांनी ते बेसावध असताना हल्ला केला आहे. या पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडे देखील कोणी वर डोळे करून पाहण्याची हिंमत जरी केली तरी त्याला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांची आज राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कणकवली विधानसभा अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, मंगेश दळवी आणि कार्यकर्ते आधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अनंत पिळणकर यांनी पुंडलिक दळवी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. तसेच यापुढे पुंडलिक दळवी यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासाचे आणि समाजकारणाचे राजकारण केले जाते, जिल्ह्यातून अवैध धंदे हद्दपार व्हावेत याकरता राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर किंवा पदाधिकाऱ्यावर या पुढच्या काळात कोणीही वर डोळे करून जरी पाहिले तरी त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असेही यावेळी पिळणकर म्हणाले आहेत. दळवी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी असे देखील पिळणकर म्हणालेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा