You are currently viewing स्वराज्य संघटनेतर्फे सावंतवाडी शहरात शिवजयंती निमित्त भव्य रॅली…

स्वराज्य संघटनेतर्फे सावंतवाडी शहरात शिवजयंती निमित्त भव्य रॅली…

कोरोनाचे नियम पाळून शिवप्रेमी रॅलीत सहभागी

सावंतवाडी
शिवजयंतीनिमित्त सावंतवाडी शहरात स्वराज्य संघटनेच्यावतीने दरवर्षी प्रमाणे भव्य दिव्य बाईक रॅली काढण्यात आली. ऐतिहासिक संस्थानच्या राजवाड्याकडून या भव्य दिव्य रॅलीला सुरुवात झाली आहे. भगवे ध्वज फडकावत भगवे फेटे परिधान करून युवकांसह र महिलांनीही या रॅलीत सहभाग घेतला. जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी सारा आसमंत दणाणून गेला. यावेळी शिवभक्त शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम व अटी पाळून रॅली काढण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 2 =