ना. जयंत पाटील यांनी केले राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे कौतुक

ना. जयंत पाटील यांनी केले राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्हा युवती राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केले.
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ॲड. निता परब यांनी संघटनात्मक बांधणी केली. प्रसिद्धीचा हव्यास नसलेल्या ॲड. नीता परब यांनी सामाजिक जाणिवेतून काम करणाऱ्या अनेक युवतींना राष्ट्रवादीच्या प्रवाहात आणले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना, सावंतवाडी येथे ॲड. निता परब यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ना. जयंत पाटील यांनी ॲड. नीता परब यांच्या संघटनात्मक कार्याचे कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा